आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: टीनएजमध्ये असा दिसायचा सुनील बर्वे, आज आहे इंडस्ट्रीचा सर्वात फिट अभिनेता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  आज अभिनेता सुनील बर्वे त्याचा पन्नासावा वाढदिवस साजरा करत आहे. मुळचा मुंबईचा असलेल्या सुनीलचा जन्म 3 ऑक्टोबर 1966 रोजी मुंबईत झाला. फार कमी जणांना माहीत आहे की सुनीलने इंडस्ट्रीत येण्याअगोदर मेडीकल रिप्रेजेंटीवचेही काम केले आहे. पण त्या कामात मन न रमल्यामुळे सुनीलने अभिनय करण्याचा निर्णय घेतला. अभिनेतासोबतच सुनीलने रेडिओ जॉकीचे कामही केले आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा लहानपणीचा लुक आणि त्याची खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
 
अशी मिळाली पहिली संधी..
सुनील नोकरी करत असताना गायन आणि तबल्याच्या क्लासला जात असे. त्यावेळी तेथील एका लहान थिएटर ग्रुपसोबत तो काम करु लागला. या थिएटर ग्रुपद्वारे त्याला विनय आपटे यांच्या अफलातून हा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. ही संधी न दडवता सुनीलने ती घेतली आणि अशाप्रकारे अभिनयातील हा प्रोजेक्ट त्याला मिळाला. या पहिल्या नाटकात सुनीलसोबत महेश मांजरेकर, अतुल परचुरे, सचिन खेडेकर यांनी काम केले होते. हे चारही कलाकार आज मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार आहेत. 
 
मानला जातो इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेता..
सुनिल बर्वे आज इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेता मानला जातो. वयाच्या पन्नाशीतही तरुणांना लाजवेल असा सुनिलचा लुक आहे. पूर्णपणे शाकाहारी आणि रोजची व्यायामाची सवय यामुळे चांगली तब्येत ठेवणे शक्य झाले असे सुनिल सांगतो. सोबतच प्रेक्षकांचे प्रेम असल्याने त्याचा आनंद सतत चेहऱ्यावर असल्याने आजही तितकाच तरुण दिसतो असे सांगायला सुनिल विसरत नाही. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर मराठी कलाकारांचे लहानपणीचे तसेच टीनएजमधील लुक...
बातम्या आणखी आहेत...