आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl: मराठीतील फेमस सिंगर नेहासाठी तिचं पवईचं घर म्हणजे ‘ड्रीमहोम’, बघा Inside Pix

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका नेहा राजपालचा आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. 23 जून 1978 रोजी मुंबईत नेहाचा जन्म झाला. नेहा गायिकेसोबतच एक डॉक्टर आहे. नेहाने नवी मुंबईतील एमजीए कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले आहे. नेहाने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'नेहा राजपाल प्रॉडक्शन' नावाची तिची स्वतःची निर्मिती संस्था आहे. तिची निर्मिती असलेला 'फोटो कॉपी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणारेय.
खासगी आयुष्य..
नेहाचा जन्म 23 जून 1978 रोजी डोंबिवली (मुंबई) शहरात झाला. तिच्या गुरू विभावरी बांधवकर यांच्याकडून किराणा घराणा पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतलेले आहे. संगीतकार अनिल मोहिले यांचे मार्गदर्शनसुद्धा तिला लाभले आहे. बंगाली, तेलुगू, गुजराती, सिंधी आणि कन्नड या भाषांमध्येसुद्धा तिने गायन केलेले आहे.
नेहाचे सांगितिक करिअर...
नेहा राजपालने आपले पहिले गाणे अनिल मोहिले यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली, ’तुझ्याचसाठी' या चित्रपटासाठी गायिले. त्यानंतर रामोजी राव यांचा 'चालू नवरा भोळी बायको', 'माणूस', 'लगीनघाई', 'माझं सौभाग्य' या मराठी चित्रपटांसाठी व 'नई पडोसन' या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी आपला आवाज दिला. सोनी म्युझिकने नेहाचा 'ये जो मोहब्बत है' हा अल्बम बनवला आहे. मराठी चित्रपटांबरोबरच 'रामायण', 'सारा आकाश', 'भाभी', 'महाभारत', हेमा मालिनीची 'कामिनी दामिनी', 'कागज की कश्ती', 'नॉक नॉक कौन है' यासारख्या लोकप्रिय हिंदी दूरचित्रवाणी मालिकांसाठी नेहा राजपालने गाणी गायली आहेत. शिवाय 'बिर्ला व्हाईट सिमेंट', 'लेक्सी पेन' यासारख्या अनेक जाहिरातीतही गाणी म्हटली आहेत. शंकर महादेवन यांच्याबरोबरही नेहाने अनेक अविस्मरणीय मैफिली रंगवल्या आहेत. इतकंच नव्हे तर देश- परदेशातही असंख्य गायनाचे कार्यक्रम यशस्वी केले आहेत व श्रोत्यांकडून वाहवा मिळविली आहे. तिला मिळालेल्या पुरस्कारांची यादीही मोठी आहे. यात सुरसंगम प्रतिष्ठानचा पुरस्कार, सोनी टीव्हीवरील ’आदाब अर्ज है’ पुरस्कार आणि ’अनिल मोहिले पुरस्कार’ या पुरस्कारांचा समावेश आहे.

आज नेहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखवतोय तिच्या ड्रीम होमची खास झलक आणि सोबतच जाणून घ्या काय आहे तिच्या घराची वैशिष्ट्ये...
वाचा, पवईचं घर म्हणजे ‘ड्रीमहोम’ आहे. नेहा सांगतेय, तिच्या घराचं वैशिष्ट्य...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...