आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईजवळ उभारला आहे अतुल कुलकर्णींनी सुंदर आशियाना, म्हणतात त्याला 'खेड्यामध्ये घर कौलारु'...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अतुल कुलकर्णी हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव. एक विचारवंत अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अतुल यांनी 10 सप्टेंबर रोजी वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. सात भाषांमध्ये 70 हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. अभिनेत्यासोबतच ते निर्मातेसुद्धा आहेत. लवकरच अतुल कंगना रनोट स्टारर 'मनकर्णिका' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांनी तात्या टोपेंची भूमिका वठवली आहे.  

खेड्यामध्ये आहे अतुल यांचे घर कौलारु...
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे या गावात अतुल आणि त्यांची पत्नी गीतांजली कुलकर्णी यांचे हे स्वप्नातील घर आकारास आले आहे. या घराला त्यांनी 'तान्सा' (TAANASA) हे नाव दिले आहे. निसर्गरम्य परिसरात त्यांचे हे घर आहे. या फार्म हाऊसचे खास फोटोज काही दिवसांपूर्वी अतुल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करुन त्याला 'खेड्यामधले घर कौलारू' हे कॅप्शन दिले होते.

3,500 स्वे.फुट आहे फार्म हाऊस...
अतुल आणि गीतांजली यांचे हे फार्म हाऊस तयार व्हायला दोन वर्षांचा कालावधी लागला. 2012 साली आर्किटेक्स मेघना कुलकर्णी यांनी या फार्म हाऊसचे डिझाइन तयार केले होते. 2014 साली या फार्म हाऊसचे काम पूर्ण झाले. या घरात एक बेडरुम असून एक मोठी लिव्हिंग रुम, किचन आणि डायनिंग एरिया आहे. घरात उत्तम व्हेंटिलेशनची सोय ठेवण्यात आली आहे. या फार्म हाऊसचे छत हे फॅब्रिकेटेड स्टील स्ट्रक्चरचे असून आतमध्ये मंगलोर टाइल्सचा वापर करण्यात आला आहे. घरात एक मोठा व्हरांडासुद्धा आहे.

गीतांजली कुलकर्णी येथेच घेतात वर्कशॉप्स...
सोनाळ्यामध्ये बांधलेल्या या घरात ‘तारपा’ नावाची संस्था गीतांजली यांनी सुरू केली आहे. याअंतर्गत नवोदित कलाकारांसाठी गीतांजली वर्कशॉप्स घेतात. शिवाय येथेच अतुल आणि गीतांजली क्वेस्ट नावाची संस्था चालवतात. या संस्थेतर्फे ते प्राथमिक शिक्षणासाठी काम करतात. गीतांजली यांनी येथे नाटकांसाठी निवासी व्यवस्था तयार केली आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, अतुल आणि गीतांजली यांच्या या ड्रीम होमचे खास Photos...

सर्व फोटोज - साभार अतुल कुलकर्णी फेसबुक पेज
बातम्या आणखी आहेत...