आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरच्या काळात डिप्रेशनमध्ये होते लक्ष्मीकांत, आजारपणामुळे झाला होता मृत्यू, वाचा Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आपल्या अचुक कॉमिक टायमिंगने लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते, तर काही काही चित्रपटांमधून प्रेक्षकांना रडवलेदेखील. मराठीतच नव्हे तर हिंदीतही आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे लक्ष्मीकांत आज आपल्यात असते तर त्यांनी वयाची 63 वर्षे पूर्ण केली असती. त्यांना या जगाचा निरोप घेऊन जवळजवळ 13 वर्षे झाली आहेत. पण कलाकृतींच्या माध्यमातून ते आजही आपल्यातच आहेत. असे म्हटले जाते, की लक्ष्मीकांत बेर्डेंना त्यांच्या अखेरच्या काही वर्षांत नैराश्याने ग्रासले होते. ते अतिमद्यपान करु लागले होते. त्यातच मुत्रपिंडाच्या आजाराने त्यांचे निधन झाले.
 
जाणून घेऊयात, लक्ष्मीकांत यांच्याविषयी आणखी बरंच काही...  
 
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते दोनदा लग्न...
- लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक अभिनेता नसून ती एक जादू होती. 26 ऑक्टोबर 1954 रोजी त्यांचा जन्म झाला होता. 
- त्यांचे पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झाले होते. पण काहीच वर्षे दोघांचा संसार टिकला. 
- अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसरे लग्न केले. या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच हिंदी चित्रपटातसुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते. 
- अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया-लक्ष्मीकांत यांच्या मुलांची नावे आहेत. अभिनयचे याचवर्षी ती सध्या काय करते या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले आहे. तर धाकटी मुलगी स्वानंदी 16 वर्षांची असून तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे.

पुढे वाचा, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी बरंच काही...
बातम्या आणखी आहेत...