आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : अरेंज मॅरेज करणा-या मृणालला नव-याने विचारले होते, \'तुम्ही पंजाबी ड्रेस घालता ना?\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 29 वर्षे पूर्ण केली आहे. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करणारी मृणाल मुळची नाशिकची असून 20 जून 1988 रोजी तिचा जन्म झाला. नाशिकमध्येच ती लहानाची मोठी झाली. येथेच तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. मृणालने मास्टर ऑफ जर्नलिझममध्ये पदवी प्राप्त केल्याचे फार कमी जणांना ठाऊक असावे. छोट्या पडद्यावर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’ या मृणालच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. शिवाय ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’मध्ये तिचा डान्सही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मृणाल मोठ्या पडद्यावरही झळकली आहे. भरत जाधव स्टारर 'श्रीमंत दामोदर पंत' या सिनेमात ती झळकली होती.
 
पुण्याची सून आहे मृणाल... 
मृणालचे गेल्यावर्षी 25 फेब्रुवारी रोजी अरेंज मॅरेज झाले. अमेरिकास्थित नीरज मोरे याच्याशी मृणालचा विवाह झाला. मुळचा पुण्याचा असलेला नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मृणाल लॉस एजंलिस येथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त गेली असताना नीरज मोरेसोबत तिची ओळख झाली होची. त्यानंतर त्यांचा संवांद फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून वाढला. दोघांचे कुटुंबीय आणि विचारांची देवाण-घेवाण झाल्यावर लग्न ठरलं. मृणाल मूळची नाशिकची तर नीरज पुण्याचा आहे. पुण्यात दोघांच्या चहा पोह्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मी आणि तो फोनवर आणि ऑनलाईन बोलत होतो. काही दिवसानंतर मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, असे मृणालने सांगितले होते.
 
नीरजने विचारलेला पहिला प्रश्न.. 
लग्नापूर्वी नीरला मृणालविषयी काहीच माहित नव्हते. याविषयी मृणाल सांगते, ''नीरजने जेव्हा माझ्याविषयी गुगलवर सर्च केले, तेव्हा त्याला माझे सर्व साड्यांमधीलच फोटो दिसले. त्यामुळे तुम्ही पंजाबी ड्रेस घालता का, हा त्याने मला विचारलेला पहिला प्रश्न होता.” मृणालने पुढे सांगितले, “नीरज आता रोज माझी मालिका पाहतो. मालिकेविषयी उत्सुकतेने विचारतो. कधी काही सुचनाही करतो. सासरचेही अस्सल पुणेकरी सुचना देतात. नीरजला मी शुटिंगलाही घेऊन आलीय. शुटिंगला आल्यावर किती मेहनत करावी लागते, हे पाहून तो चाटच पडला.”
 
पुढे वाचा, लग्नाच्या अवघ्या 20 दिवसांत परतली होती शूटिंगवर... आणि सोबतच बघा, मृणालचा वेडिंग अल्बम... 
बातम्या आणखी आहेत...