आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड अँड ब्युटीफूल प्रिया@30 : बघा B\'day गर्लची इंस्टा डायरी, शेअर करते ग्लॅमरस फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरूवात करणारी अभिनेत्री प्रिया बापट आज मराठी इंडस्ट्रीतील एक स्टाईल आयकॉन झाली आहे. प्रियाच्या पहिल्याच सिनेमाने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. प्रियाचं सौंदर्य आणि बबली अदांनी तिच्या चाहत्यांमध्ये आज मोठी भर पडली आहे.
प्रियाने हिंदी सिनेमामद्ये डेब्यू केलं ते जब्बार पटेल यांच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या सिनेमातून. या सिनेमात प्रियाने बालपणीच्या रमाबाईंची भूमिका केली होती. त्यानंतर ‘मुन्नाबाई एमबीबीएस’ या सिनेमातही तिने एक भूमिका केली होती. त्यानंतर मराठीतील अनेक सिनेमांमधून तिने दमदार भूमिका केल्या आहे. मात्र, तिने केलेल्या रोमॅंटिक भूमिका प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरल्या आहेत. ‘कोकणस्थ’ या सिनेमातील सुद्धा तिची भूमिका खूप पसंत केली गेली होती. सोबतच तिचं ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटकही चांगलंच गाजलं होतं. आज ती मराठीतील टॉप अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते.
प्रियाचा उद्या म्हणजे 18 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून ती वयाची 30 वर्षे पूर्ण करत आहे. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखवतोय तिची खास छायाचित्रे. प्रिया फेसबुक, इंस्टाग्रामवर अॅक्टिव असून नित्यनेमाने आपली छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंडियन आणि वेस्टर्न आउटफिट्समध्ये प्रिया अतिशय सुंदर दिसते.

चला तर मग बघुयात बोल्ड अँड ब्युटीफूल प्रियाची इंस्टा डायरी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...