आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: एकेकाळी पेट्रोल पंपावर काम करायची ही मराठी अॅक्ट्रेस, पडद्यावर दिले इंटीमेट सीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघर्षातून वाट काढत यशोशिखर गाठणा-या कलाकारांमध्ये आवर्जुन उल्लेख करावा असे एक नाव म्हणजे सिया पाटील. घरी अभिनयाची पार्श्वभूमी नसतानादेखील मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी ही अभिनेत्री. 'झक मारली बायको केली', 'कॅश करुनी अॅश करू', 'चल गंमत करू', 'नवरा माझ्या बायकोचा', 'भागम भाग', 'अपना सपना बोंबाबोंब', 'बाप रे बाप', 'मोहन आवटे', 'धूम टू धमाल', 'पक्याभाई', 'गर्भ', यांसह अनेक मराठी सिनेमांमध्ये स्वतःचा ठसा उमटवणा-या सियाचा आज वाढदिवस आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मराठी ते बॉलिवूड असा प्रवास करणा-या सियाचा जन्म 6 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील राजेवाडी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानादेखील सियाने आपले शिक्षण पूर्ण केले. प्रसंगी तिने सकाळी दोन तास दहावीचे गणिताचे क्लास घेतले आणि संध्याकाळी दोन तास पेट्रोलपंपावर आणि फूडवर्डवर अकाऊण्टण्टचे कामसुद्धा केले.
 
आज सिया केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. 2014 साली डोंबिवली रिटर्न या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2005 साली रिलीज झालेल्या डोंबिवली फास्ट या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णीसोबत सियाने इंटीमेट सीन्स दिले होते. मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री म्हणून सियाला ओळखले जाते. 
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सियाच्या संघर्षमय प्रवासाविषयी सांगत आहोत.. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या सिया पाटील हिच्या सर्वकाही... आईवडील आणि भाऊ यांचे झाले निधन...  
बातम्या आणखी आहेत...