आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: प्रियाने घातली होती उमेशला लग्नाची मागणी, बघा क्यूट कपली रोमँटिक केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील बबली अभिनेत्री प्रिया बापट आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रियाने मराठी सिनेसृष्टीतील हॅण्डसम अभिनेता उमेश कामतसोबत लग्न केले आहे. उमेश आणि प्रिया यांना मराठी फिल्म इंडस्ट्रीत क्यूट कपल म्हणून ओळखले जाते.
ऑक्टोबर 2011 मध्ये हे दोघे लग्नगाठीत अडकले. लग्नापूर्वी सहा वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. प्रियाने उमेशला लग्नाची मागणी घातली होती. मात्र उमेशने लगेचच तिला आपला होकार दिला नव्हता. यासाठी त्याने खास दिवसाची वाट पाहिली होती. 18 सप्टेंबर म्हणजचे प्रियाच्या वाढदिवशी उमेशने प्रियाला लग्नासाठी होकार दिला होता.
आज प्रियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या क्यूट कपलची खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये प्रिया आणि उमेश यांच्यातील प्रेमाची केमिस्ट्री दिसून येते.
चला तर मग पाहा प्रिया-उमेशची खासगी आयुष्यातील ही खास झलक..
(फोटो साभारः फेसबुक)
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...