आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 वर्षांचा झाला \'परशा\', बघा सोशल मीडियावर अॅक्टिव असलेल्या बर्थडे बॉयची Insta Diary

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'सैराट' या सिनेमात 'परशा' ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता आकाश ठोसर एका रात्रीतून स्टार झाला. सिनेमाचा हीरो आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरु असल्याचे म्हटले जात आहे. मात्र डॅशिंग आर्चीला शोभणारा हीरो आकाशने उत्तम वठवला. आकाशच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक झालं. पदार्पणाच्या सिनेमात त्याने दमदार भूमिका केल्याने मराठी इंडस्ट्रीला एक हँडसम हिरो भेटल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. आता आकाश लवकरच महेश मांजरेकरांच्या 'फन अनलिमिटेड' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकणारेय. या सिनेमात आकाश महाविद्यालयीन तरुणाच्या भूमिकेत दिसणारेय. 

तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आकाशचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 24 वर्षे पूर्ण केली आहेत. 24 फेब्रुवारी 1993 रोजी आकाशचा जन्म झाला. 'सैराट' सिनेमापूर्वी अतिशय सामान्य तरुण असलेला आकाश आता मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार झाला आहे. मराठीतील इतर सेलिब्रिटींप्रमाणे आकाशसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. विविध इव्हेंट्स, स्टेज शो, शूटिंग सेटवरील फोटोज तो नित्यनेमाने सोशल मीडियावर शेअर करत असतो. आज आकाशच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल तर सांगतोय, सोबतच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील त्याने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोचे खास कलेक्शनसुद्धा तुम्हाला येथे बघता येईल.  

चला तर मग जाणून घ्या बर्थडे बॉयविषयी सर्वकाही आणि सोबतच बघा त्याची Insta Diary... 
बातम्या आणखी आहेत...