आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिल आहे शशांक केतकरची भावी पत्नी, बघा प्रियांकासोबतची क्यूट केमिस्ट्री दाखवणारे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता शशांक केतकर लवकरच पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यासोबत शशांकने पहिला संसार थाटला होता. पण लग्नाच्या काही महिन्यांतच दोघांत मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. प्रियांका ढवळे हे शशांकच्या भावीच पत्नीचे नाव असून तिच्या रुपात शशांकच्या आयुष्यात प्रेमाची नवी पालवी फुटली आहे. 

वकील आहे प्रियांका...
प्रियांका ढवळे ही मुळची डोंबिवलीची असून व्यवसायाने वकील आहे. शिवाय ती उत्कृष्ट नृत्यांगणादेखील आहे. तिने भरतनाट्यमचे शास्त्रशुद्धा शिक्षण घेतले आहे. जिथे जिथे मी कमी पडतो, तिथे प्रियांका मला सांभाळून घेत असते, असे शशांक सांगतो. 

अमृता खानविलकरने शेअर केला होता शशांक-प्रियांकाचा पहिला फोटो...
काही महिन्यांपूर्वीच शशांक आणि प्रियांकाचा साखरपुडा झाला. या साखरपुड्याचा पहिला फोटो अभिनेत्री अमृता खानविलकरने शेअर करुन शशांकच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली होती.   

शशांकच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे प्रियांकासोबतचे अनेक फोटोज बघायला मिळतात. फोटोजमधील या दोघांमधील क्युट केमिस्ट्री लक्ष वेधून घेते.
 
आज (15 सप्टेंबर) शशांकच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात, त्याचे प्रियांकासोबतचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...