मुंबई : वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' या अप्रतिम कलाकृतीवर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट : असा नट होणे नाही' या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला. प्रेक्षकांना तो केवळ आवडलाच नाही तर तो भावला. जबरदस्त अभिनय, दमदार संवादांनी परिपूर्ण असलेल्या या सिनेमाचे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही कौतुक केले आहे. ट्विटरवरुन त्याने या सिनेमाचे कौतुक केलेय.
'मी हा चित्रपट पाहिला. जबरदस्त चित्रपट आहे. नानांचा अभिनय दमदार आहे. तसेच विक्रम गोखलेंनीही तोडीस तोड अभिनय केलाय. खरंच 'असा नट होणे नाही'. महेश, नाना, विक्रमजी आणि संपूर्ण टीमने छान काम केले.' असे आमिरने ट्विट केले. पुढील स्लाईडमध्ये वाचा, आमिरचे ट्विट्स...