आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे ऐश्वर्या, आतापर्यंत या 13 बॉलिवूड कलाकारांनी मराठीत केले रोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  मराठी चित्रपटसृष्टीचे स्वरुप आता पूर्णपणे बदलले आहे. एकाहून एक दर्जेदार चित्रपट, कथा असल्याने आता बॉलिवूड निर्माते, दिग्दर्शक, कलाकारही मराठीकडे वळताना दिसत आहेत. आता ताजेच उदाहरण द्यायचे झाले तर अभिनेता हृतिक रोशनने मराठी चित्रपट हृद्यांतरमध्ये एक लहानसा रोल केला तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीसने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन उपस्थित होती.
 
यावेळी उपस्थित असलेल्या ऐश्वर्याला मराठी चित्रपटाबाबत तिचे मत काय याबाबत विचारणा झाली. यावर ऐश्वर्याने ती मराठीत काम करण्यास उत्सुक आहे आणि उत्तम अशा चित्रपटाच्या स्क्रिप्टची वाट पाहत आहे असे सांगितले. त्यामुळे ऐश्वर्याने लवकरच या मराठी चित्रपटात झळकण्याची चिन्हे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 
 
आतापर्यंत अनेक बॉलिवूड सुपरस्टार कलाकारांनी मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यात अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, रेखा यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. आज अशाच काही इतर कलाकारांची माहिती घेऊन आलो आहोत. 
 
1. सलमान खानने रितेश देशमुखचा चित्रपट 'लय भारी'मध्ये काम केले आहे. या चित्रपटातील त्याची लहानशी भूमिका होती. सलमान आता शिक्षणाच्या आयचा घो आणि यलो या दोन मराठी चित्रपटांचा हिंदीत रिमेक करण्याच्या तयारीत आहे. 
 
2. हृतिक रोशनने विक्रम फडणीस यांच्या 'हृद्यांतर' या चित्रपटात कॅमिओ केला होता.

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, आतापर्यंत मराठी चित्रपटात काम केलेले कलाकार....
बातम्या आणखी आहेत...