आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट मुलगी ईशासोबत पहिल्यांदाच दिसले धर्मेंद्र, लवकरच होणार आहेत आजोबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री ईशा देओल लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. अलीकडेच ईशाने तिचे वडील धर्मेंद्र यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत तिचे बेबी बम्प स्पष्ट दिसत आहेत. या फोटोसोबत ईशाने एक सुंदर कॅप्शन दिले आहे. ईशाने लिहिले, "ONE LOVE! ONE HEART! ❤️ @aapkadharam".
 
पहिल्यांदाच आपल्या गर्भवती मुलीसोबत पोज देताना दिसले धर्मेंद्र..
ईशा आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करत आहे. याकाळातील बरेच फोटोज तिने सोशल मीडियावरदेखील पोस्ट केले आहेत. पण वडिलांसोबतचा तिचा हा पहिलाच फोटो समोर आला आहे. अलीकडेच ईशाने तिच्या सासूबाईंसोबतचासुद्धा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोसोबत तिने लिहिले होते, "Dinner date with my darlings, my in laws .... strike a pose with mum in law as pop photo bombs through the mirror ❤️????????#photobomb#myinlaws #muminlaw #popinlaw#yummy#chinesefood #mumbaimerijaan #familygoals @bharattakhtani3".

गेल्या महिन्यात ईशाचे दोनदा डोहाळे जेवण झाले. या दोन्ही कार्यक्रमांचे फोटोज ईशाने तिच्या फॅन्ससाठी शेअरदेखील केले होते. ईशाचे 29 जून 2012 रोजी बिझनेसमन भरत तख्तानीसोबत मुंबईतील इस्कॉन मंदिरात थाटात लग्न झाले होते. लग्नाच्या पाच वर्षआंनी हे कपल आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करत आहेत. 

पुढील स्लाईड्सवर बघा, प्रेग्नेंसीच्या काळातील ईशाचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...