आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Priyanka Chopra Producing Marathi Film Ventilator

प्रियंका चोप्रा करतेय मराठी फिल्म, यंदा गणेशोत्सवात प्रदर्शित होणार ‘Ventilator’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षयकुमार, शाहरूख खान, रोहित शेट्टी आणि संजय लीला भन्सालीं पाठोपाठ प्रियंका चोप्राही आता मराठी फिल्म निर्मितीमध्ये उतरतेय. ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ ह्या आपल्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे प्रियंका चोप्रा ‘व्हेंन्टिलेटर’ ह्या आपल्या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती करतेय. ‘व्हेंन्टिलेटर’ ह्या कॉमेडी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक असतील राजेश मापुसकर.
‘फेरारी की सवारी’ सारख्या कॉमेडी चित्रपटांनी आपल्याला पोटधरून हसवल्यावर आता राजेश मापूसकर ‘व्हेंन्टिलेटर’मधून हसवायला सज्ज होतायत. येत्या फेब्रुवारीमध्ये चित्रीकरणाला सुरू करण्याअगोदरच्या प्री-प्रॉडक्शनमध्ये सध्या राजेश व्यस्त आहेत.
त्यांना चित्रपटाविषयी विचारल्यावर ते म्हणतात, “खरं तर ही फिल्म करण्याची प्रोसेस सहा महिने अगोदरपासून सुरू झाली होती. त्यावेळी मी चित्रपट लिहीत असतानाच माझ्या एका स्नेहींनी मला प्रियंकाशी भेट घडवून दिली. आणि प्रियंकाला मराठी चित्रपट निर्मितीत उतरायचं असल्याचं सांगितलं. खरं तर, प्रियंकासारख्या बॉलीवूड आणि आता हॉलीवूडमध्येही यश मिळवत असलेल्या हिरोइनने प्रादेशिक चित्रपटात उतरावं, ह्याचं सुरूवातीला आश्चर्य वाटलं. पण प्रियंकाशी भेट झाल्यावर लक्षात आलं की, ती आपल्या निर्मितीसंस्थेबाबत किती गंभीर आहे.”
प्रियंकाच्या मराठीबाबत सांगताना राजेश मापुस्कर म्हणतात, “एक अभिनेत्री म्हणून ती इतरांसारखीच मला माहित होती. पण तिची मराठीविषयी जाण मला तिला भेटल्यावर कळली. तिने गेल्या काही वर्षात हिंदी चित्रपटात एवढ्या मराठी भुमिका साकारल्यात, आणि मुंबईत राहिल्यामूळेही असावं कदाचित तिला मराठीविषयी खूप आत्मियता जाणवली. प्रियंका निर्माती आहे, म्हणजे ती फक्त तिचं नाव लावत नाहीये. तर ती फिल्ममेकिंगमध्ये खूप रस घेतेय. आम्ही संहितेचं वाचन करत असतानाही ती जातीने हजर असते. त्यातले मराठी संदर्भ तिला अचूक कळतात. त्यामूळे माझ्या ह्या कथानकाला अशी निर्माती मिळाल्याचं मला समाधान आहे.”
ह्या चित्रपटातल्या स्टारकास्टबद्दल विचारल्यावर राजेश म्हणतात, “ स्टारकास्ट फायनल करण्याचे काम सुरू आहे. त्यामूळे ह्याविषयी किंवा कथानकाविषयी आत्ता काही बोलणे शक्य होणार नाही. मात्र ह्यात तुम्हांला अर्धी मराठी फिल्म इंडस्ट्री दिसेल. कारण ह्यात खूप पात्र आहेत. ही फिल्म कॉमेडी आहे. ह्यातल्या घटना तुम्हांला आपल्या आयुष्याशी निगडीत असल्याचं हा चित्रपट पाहताना नक्कीच वाट्टेल. आणि त्यामुळे हा चित्रपट तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल ह्याची मला खात्री आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राजेश मापुस्कर आणि प्रियंका चोप्राचा फोटो