आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO+PICS : मराठमोळ्या ठसक्यात सनी विचारतेय, 'कुठं कुठं जायाचं हनीमूनला...'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवधुत गुप्तेंच्या 'बॉईज' या आगामी मराठी चित्रपटात बॉलिवूडची बेबी डॉल अर्थातच सनी लिओनीचा मराठमोळा ठसका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात सनीवर चित्रीत झालेले 'कुठं कुठं जायाचं हनीमूनला...' हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले असून या गाण्यात सनी लावणीवर थिरकताना दिसतेय. या गाण्यातील सनीच्या दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करतील अशा आहेत.
 
गडद भगव्या आणि हिरव्या रंगाच्या नऊवारीसोबतच शॉर्ट वेस्टर्न आउटफिटमध्ये सनी दिसतेय. मुख्य म्हणजे सनीने परिधान केलेल्या नऊवारीला थोडा स्टायलिश टच देण्यात आला असून, हा टच देत असताना त्यातील पारंपारिक बाज तसाच ठेवण्यात आला आहे.‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ आणि ‘मेरा बाबू’ या दोन गाण्यांचं मॅशअप यात असून सुनिधी चौहानने या गाण्याला स्वरसाज चढवला आहे.  

घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या युवा पिढीची दुनिया या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पार्थ भालेरावसह संतोष जुवेकर, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमिनेस आणि वैभव मांगले या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. येत्या 8 सप्टेंबरला  'बॉईज' हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय. 

पाहुयात, 'कुठं कुठं जायाचं हनीमूनला...' या गाण्यातील सनीच्या दिलखेचक अदा आणि शेवटच्या स्लाईडवर गाण्याचा व्हिडिओ... 
बातम्या आणखी आहेत...