1951 मध्ये रिलीज झालेल्या 'अलबेला' या सिनेमातील 'भोली सूरत दिल के खोटे...', 'श्याम ढले खिडकी तले...' ही गाणी आजही रसिकांच्या ओठी आहेत. ही गाणी आठवली की डोळ्यासमोर उभे राहतात ते भगवान दादा. भगवान दादांची नृत्य करण्याची स्वतःची स्टाईल होती आणि त्याच स्टाईलवर आज कित्येक पिढ्या थिरकत आहेत. याच भगवानदादांच्या जीवनपटावर आधारिच 'एक अलबेला' हा सिनेमा मराठीत येतोय. नितीन पटवर्धन दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता मंगेश देसाई मेन लीडमध्ये असून भगवान दादांची भूमिका वठवत आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हजारो तरुणांच्या काळजाचे ठोके चुकवणारी विद्या बालन 'एक अलबेला'मध्ये गीता दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता मंगेश देसाई यांनी आपल्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवरुन ही बातमी दिली आहे. त्यांनी लिहिले, "मी तुम्हाला एक न्यूज देणार होतो ती हीच. एक अलबेला या मराठी फिल्ममध्ये विद्या बालन काम करत आहेत माझी हीरोईन. कालपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तुमच्या शुभेच्छा असू द्या."
हा सिनेमा अधिक वास्तववादी बनविण्यासाठी निर्मात्यांनी बॉलिवूडचे मेकअप मॅन विद्याधर भट्टे यांची मदत घेली आहे, कारण प्रोस्थेटिक मेकअपची आवश्यकता लागणार आहे. या सिनेमात 'अलबेला’या हिंदी सिनेमातील दोन गाणी असणार आहेत, शिवाय दोन नवीन गाणीसुद्धा असतील. विद्या बालन आणि मंगेश देसाई यांच्यासोबत विद्याधर जोशी, प्रसाद पंडित आणि स्वप्नील राजशेखर या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
एकंदरीतच काय तर विद्या बालनला हिंदीनंतर आता मराठी पडद्यावर बघणे ही तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट असणारेय.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, अभिनेता मंगेश देसाईने शेअर केलेली पोस्ट...