आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood And Marathi Celebs Talking About Marathi Film Pinddan

'पिंडदान'विषयी एक्साइटेड आहेत बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रेटी, जाणून घ्या काय सांगताहेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅशन फोटोग्राफीमध्ये 'बंटी प्रशांत' या नावाला विशेष ग्लॅमर आहे. गेल्या १५ वर्षांत फॅशन वर्ल्डमध्ये वावरल्यानंतर ही जोडी आता मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे. आगामी 'पिंडदान' या चित्रपटाद्वारे ते मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत पाटील यांनी केलं असून, बंटी देशपांडे यांनी छायाचित्रण केलं आहे. बंटी प्रशांत यांच्या फॅशन स्टुडिओतून अनेक मॉडेल घडल्या. त्यातील काहींनी अभिनय क्षेत्रातही नाव कमावलं. अभिनेत्री प्राची देसाई, तेजस्विनी पंडित, अभिनेता भूषण प्रधान ही त्यापैकीच काही नावं.

फॅशन इंडस्ट्रीतलं मोठं नाव असलेल्या बंटी प्रशांत यांच्या 'पिंडदान' या चित्रपटाविषयी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मॉडेल-अभिनेत्री मुग्धा गोडसेपासून ते अभिनेता भूषण प्रधानपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी बंटी प्रशांत यांना या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या असून, चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
सारथी एंटरटेन्मेंटच्या पूनम शेंडे यांनी प्रस्तुत केलेल्या 'पिंडदान' या चित्रपटाची निर्मिती उदय पिक्चर्स, अश्तिका इरा एलएलपी यांनी केली आहे. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ बंटी प्रशांत फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. अनेक वर्षं फॅशन इंडस्ट्रीत वावरल्यानंतर या दोघांनी 'पिंडदान' हा चित्रपट केला आहे. त्यांच्या जाहिरात आणि फॅशन क्षेत्रातील अनुभवातून साकारलेल्या 'पिंडदान'मध्ये उत्तम कथानक आणि उत्तम कलाकार दिसणार आहेत.
काय म्हणाताहेत, 'पिंडदान'विषयी बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटी जाणून घेऊयात पुढील स्लाईड्सवर...