आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Box Office Collection Of TP2 In 3 Days Is 10.9 Cr

\'टाइमपास 2\' पडला \'लय भारी\'वर भारी, तीन दिवसांत जमवला 11 कोटींचा गल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट)
मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास 2' या सिनेमाने अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या तीन दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या सिनेमाने रितेश देशमुखच्या 'लय भारी'चा रेकॉर्ड मोडित काढला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'टाइमपास 2'ने रिलीजच्या तीन दिवसांत तब्बल 11 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर 'लय भारी' या सिनेमाच्या नावे तीन दिवसांत 10 कोटी 3 लाखांची कमाई केल्याचा रेकॉर्ड होता.
1 मे रोजी रिलीज झालेल्या 'टाइमपास 2' या सिनेमाने 'लय भारी'चा पहिल्या दिवसाच्या कमाईचाही रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 3.80 कोटींची विक्रमी कमाई केली. तर 'लय भारी'चा पहिल्या दिवसाचा कमाईचा आकडा हा 3 कोटी 10 लाख एवढा होता.
'टाइमपास 2' हा 'टाइमपास' या सिनेमाचा सिक्वेल आहे. प्रेक्षकांनी 'टाइमपास'ला डोक्यावर उचलून धरले होते. त्यातील नया है वह, आईबाबा अन् साईबाबाची शप्पथ आदी संवाद तर प्रत्येकाच्या ओठी रुळले होते. 'टाइमपास 2' या सिनेमात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट मेन लीडमध्ये असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या आयटम नंबरची ट्रीट प्रेक्षकांना मिळाली आहे.
एकंदरीतच बॉक्स ऑफिसवरील 'टाइमपास 2'चा कमाईचा आकडा बघता हा सिनेमाही प्रेक्षकांनी उचलून धरलाय हे नक्की. 'टाइमपास'चा एकुण व्यवसाय हा 37 कोटींच्या घरात होता. आता 'टाइमपास 2' मराठी सिनेमांचे कमाईचे मागील सर्व रेकॉर्ड मोडित काढत नवा इतिहास रचतो का? ते पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळवलेल्या 'टाइमपास 2' या सिनेमाची निवडक छायाचित्रे...