आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candid Moments From The Set Of Marathi Serial Honar Sun Me Hya Gharachi

Candid Moments : \'होणार सून..\'ची सांगता, शूटिंग सेटवर असे निवांत क्षण घालवायचे स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'होणार सून मी ह्या घरची\' मालिकेच्या टीमवर निवांत क्षणी कलाकार - Divya Marathi
\'होणार सून मी ह्या घरची\' मालिकेच्या टीमवर निवांत क्षणी कलाकार

एन्टरटेन्मेंट डेस्कः अडीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेचा 24 जानेवारी रोजी समारोप झाला. जान्हवी-श्रीच्या बाळाच्या बारश्याने मालिकेचा सुखद शेवट झाला. ही मालिका संपली म्हणून काहींनी सुटकेचा निःश्वास सोडला, तर काहींना मात्र आता श्री-जान्हवी भेटणार नाही, म्हणून दुःख व्यक्त केले. कलाकारांनीचीही हसू आणि रडू अशीची काही अवस्था झाली.
खरं तर दैनंदिन मालिकांचे शूटिंग करताना कलाकारांसाठी सेट हे घरासारखे होऊन जाते. शूटिंगदरम्यानच्या अनेक गमतीजमती हे कलाकार एन्जॉय करत असतात. असेच काहीसे होणार सून मी ह्या घरची या मालिकेच्या कलाकारांसोबतही घडले. शूटिंगच्या फावल्या वेळेत हे कलाकार एकत्र वेळ घालवायचे. त्यांच्या या निवांत क्षणाची काही खास छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या छायाचित्रांना बघून या सर्व स्टार्समध्ये एक चांगले बाँडिंग निर्माण झाल्याचे दिसून येते.
पुढील स्लाईड्समध्ये 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेच्या सेटवरील कलाकारांची काही खास छायाचित्रे... आता मालिका संपल्याने ही छायाचित्रे या कलाकारांसाठी एक नक्कीच आठवणीतील ठेवा असणारेय.