आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गणपती स्पेशल' कार्यक्रमात राणादा, पाठकबाई, शीतली अन् आज्या सर्वांनी केली अशी धमाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क -  श्रावण महिना संपत आले की आपल्या सर्वांनाच वेध लागतात ते गणपती बाप्पाचे. आपल्या सर्वांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाच्या उत्सवासाठी सगळेच वर्षभर पाहत असतात. आपल्या सर्वांसाठी ज्याप्रमाणे हा उत्सव म्हणजे पर्वणी असते, त्याचप्रमाणे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठीही ही पर्वणी असते. गणरायावर आधारित विविध कार्यक्रम, मालिकांमधील गणेशोत्सव, वाहिन्यांवरील कलाकारांची गणेशोत्सवातील रेलचेल असा सगळीकडे झगमगाटच पाहायला मिळत असतो. गणेशोत्सवाचा असाच झगमगाटत झी टीव्हीच्या एका कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. 

झी टीव्हीच्या एका कार्यक्रमाच्या शूट दरम्यानचे फोटो नुकतेच एका फेसबूक शेयरवर पोस्ट करण्यात आले. या फोटोंना फक्त गणपती स्पेशल एवढेच कॅप्शन दिलेले होते. त्यामुळे हा कार्यक्रम नेमका काय होता, आणि तो केव्हा प्रसारीत होणार हो स्पष्ट झालेले नाही. पण तरीही हा कार्यक्रम झी टीव्हीवर असल्याचे स्पष्ट होते. सेटवर मा झी वाडी ग्रामपंचायत असे लिहिलेले आहे. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांमध्ये, तुझ्यात जीव गुंतला, लागिरं झालं जी, चला हवा येऊ द्या आणि गाव गाता गजाली या मालिकांमधील कलाकारांची उपस्थिती असल्याचे दिसले. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहणाऱ्या जयवंत वाडकर यांनी हे फोटो शेयर केले आहेत. चला तर मग पाहुयात या कलाकारांची गणपती स्पेशल धमाल. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांचे काही PHOTOS...
(सर्व फोटो जयवंत वाडकर यांच्या फेसबूक पेजवरून साभार)
बातम्या आणखी आहेत...