आज सगळीकडे गणरायाचे वाजतगाजत आगमन होत आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि 'कच्चा लिंबू' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारे रवी जाधव यांनी तर स्वतः बाप्पा साकारला आहे. रवी जाधव यांनी पत्नी मेघनासोबत मिळून मोठया उत्साहाने मनमोहक बाप्पा साकारला आहे. त्यांनी गणपतीची मुर्ती घडवितानाचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. मोरया असे स्टेटसदेखील अपडेट केले आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, रवी जाधव यांनी साकारलेला बाप्पा...