आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrity Ganesha Actress Tejashree Pradhan\'s Gauri Ganpati Celebration

Celebrity Ganesha: तेजश्री प्रधानकडे गौरीपूजनाला मटण-वडे, वाचा तिच्या गौरी-गणपतीबद्दल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेजश्री प्रधान
तेजश्री प्रधानच्या घरी गौरी-गणपती असतात. तिथीनूसार कधी पाच किंवा सात दिवसांचे गणपती प्रधानांकडे असतात. यंदा पाच दिवस तेजश्रीच्या घरी गौरी-गणपती असणार आहेत.
आपल्या घरच्या गणेशेत्सवाच्या परंपरेवषयी तेजश्री सांगते, “माझ्या लहानपणी माझ्या आजी-आजोबांकडे गणपती असायचे. तिथे आम्ही सगळे एकत्र जमायचो. पण नंतर हळूहळू सगळ्यांची घरं वेगवेगळी झाली. आणि प्रत्येकालाच वाटू लागलं, की आपल्या घरी गणपती यावा. मग आता माझ्या वडिलांचे तीन चुलत भाऊ, एक सख्खा भाऊ आणि माझे वडिल अशा पाच भावंडाच्या घरी फिरता गणपती असतो. त्यामूळे दर पाच वर्षांनी माझ्या घरी गणपती येतो. आणि तिथीनूसार, कधी पाच तर कधी सात दिवसांचा गणपती असतो.यंदा माझ्या सख्या काकांकडे गोरेगांवला गणपतीसाठी आम्ही जमलोय.”
तेजश्री आपल्या शाळेतल्या ग्रुपविषयी सांगते, “ माझा शाळेतला आठजणांचा ग्रुप आहे. गेल्या बारावर्षात आम्ही एकमेकांसाठी भावंडापेक्षाही जवळचे झालो आहोत. ते माझ्या घरी गणपतीचे मखर बनवायला येतात. आम्ही सगळे एकत्र बसून मखर बनवतो. गेल्या वर्षी तर मी घरीच नव्हते. माझं शुटिंग चालू होतं. पण त्याने काही अडलं नाही. माझा हा ग्रुप माझ्या घरी बसून माझ्या घरच्या गणपतीसाठी मखर बनवण्यात गुंतला होता.”
तेजश्री नैवेद्याविषयी सांगते, “ गणपतीच्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून सगळ्या बायका स्वयंपाकघरात असतात. अगदी तीन वर्षाच्या भाच्यांपासून ते आजीपर्यंत सगळ्याजणी मोदक बनवतात. आणि एकत्र मोदक आणि नैवेद्याचा स्वयंपाक करताना गप्पांचा फड रंगतो. कारण वर्षभरातल्या भरपूर गप्पा मारायच्या राहून गेलेल्या असतात.मी ही त्यादिवशी आपलं सेलिब्रिटीपण घराबाहेर ठेवून घरातल्या साध्या कपड्यांमध्ये सर्वांसमोर कंबर कसून कामाला लागते. गणपती म्हटल्यावर घराबाहेर रांगोळीही आम्ही बहिणी काढतो.”
तेजश्री आपल्या घराण्याच्या प्रथेविषयी सांगताना पूढे म्हणते, “ आमच्याकडे गणपतीच्या दिवशी सहस्रनाम होते. तर दूस-यादिवशी सहस्त्रावर्तन असते. सहस्त्रावर्तानासाठी ११ भटजी येतात. शिवाय आम्ही सगळी भावंड पहाटे पाट पासून सहस्त्रावर्तानासाठी बसतो. जे तीन ते साडे तीन तास चालते. तुम्ही कितीही व्यस्त असाल, तरीही गणपतीच्या दिवसात घरीच असायचं, हा आमचा अलिखीत नियम आम्ही कधीच मोडत नाही.”
(फोटो-प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, गौरी पूजनाचा मटण-वड्यांच्या नैवेद्याबद्दल