आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Ganesha: तेजश्री प्रधानकडे गौरीपुजनाला मटण-वडे, वाचा तिच्या गौरी-गणपतीबद्दल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेजश्री प्रधानच्या घरी गौरी-गणपती असतात. तिथीनूसार कधी पाच किंवा सात दिवसांचे गणपती प्रधानांकडे असतात. आपल्या घरच्या गणेशेत्सवाच्या परंपरेवषयी तेजश्री सांगते, “माझ्या लहानपणी माझ्या आजी-आजोबांकडे गणपती असायचे. तिथे आम्ही सगळे एकत्र जमायचो. पण नंतर हळूहळू सगळ्यांची घरं वेगवेगळी झाली. आणि प्रत्येकालाच वाटू लागलं, की आपल्या घरी गणपती यावा. मग आता माझ्या वडिलांचे तीन चुलत भाऊ, एक सख्खा भाऊ आणि माझे वडील अशा पाच भावंडाच्या घरी फिरता गणपती असतो. त्यामुळे दर पाच वर्षांनी माझ्या घरी गणपती येतो आणि तिथीनूसार, कधी पाच तर कधी सात दिवसांचा गणपती असतो.”
तेजश्री आपल्या शाळेतल्या ग्रुपविषयी सांगते, “माझा शाळेतला आठ जणांचा ग्रुप आहे. गेल्या बारा वर्षात आम्ही एकमेकांसाठी भावंडापेक्षाही जवळचे झालो आहोत. ते माझ्या घरी गणपतीचे मखर बनवायला येतात. आम्ही सगळे एकत्र बसून मखर बनवतो.”
तेजश्री आपल्या घराण्याच्या प्रथेविषयी सांगताना काय म्हणाली आणि यासह बरेच काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...