आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Ganesha: नवसाचा आहे जुई गडकरीच्या घरचा गणपती, जाणून घ्या कसे असते सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या बाप्पासोबत जुई गडकरी - Divya Marathi
आपल्या बाप्पासोबत जुई गडकरी
'पुढचं पाऊल' मालिकेत सरदेशमुखांची सून कल्याणी अर्थातच अभिनेत्री जुई गडकरीच्या घरी दरवर्षी बाप्पा येतो. पुढचं पाऊलमध्ये गणेशोत्सवात जेवढी ती नखशिखांत नटलेली दिसते. तेवढीच घरी ती अगदी साधी राहणचं पसंत करते, हे तुम्हांला फोटो पाहून समजलं असेलच. जुई गडकरीच्या घरी कर्जतला गेली अनेक वर्ष गणपती बसतो. त्यामुळे कितीही महत्वाचं काम असलं तरीही ते सोडून दरवर्षी गणपती जेव्हा घरी असतो, तेव्हा जुई घराबाहेर बिलकुल पडतं नाही.
जुई आपल्या बाप्पाविषयी सांगते, “आमच्या घरी दिड दिवसांसाठी बाप्पा येतो. एवढ्या कमी वेळासाठी तो येतो. तर तेव्हा घराबाहेर कसं पडायचं. माझ्या बाबांच्यावेळी आजीने नवस केला होता. त्यामुळे त्यांच्या जन्मापासून घरी गणपती येतो आणि आमच्याकडे आजपर्यंत जे कोणी दर्शनाला आलेत, त्यांची मनोकामना पूर्ण झालीय. आमचं खूप मोठं कूटूंब आहे आणि कुटूंबाचा एक नियम आहे. तुम्ही वर्षभर कुठेही असा, गणपतीत घरीच थांबायचं. हा नियम आम्ही सगळी भावंड पाळतो. त्यामूळे ते दोन दिवस शुटिंगला सुट्टी असते.”
पुढे वाचा, जुईच्या घरच्या सेलिब्रेशनचं वैशिष्ठ्य आणि बरंच काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...