आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrity Ganesha Nach Baliye Fame Amruta Himanshu\'s Ganpati

Celebrity Ganesha:वाचा, अमृताची कोणती इच्छा हिमांशूमूळे झाली पूर्ण, पाहा,Photo तिच्या गणपतीचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'नचबलिये' फेम एक्टर कपल अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राचा लग्नानंतरचा यंदाचा पहिला गणेशोत्सव आहे. आणि यंदाचं दूसरं वैशिष्ठ्य आहे, की यंदा गणपती आणण्याचे हिमांशूच्या घरचं पाचवं वर्ष आहे.
हिमांशू आपल्या बाप्पाभक्ती बद्दल सांगतो, “मी जवल जवळ दहा वर्षांपर्वी मुंबईत राहायला आलो. मुंबईत आल्यावर अंधेरीत राहयचो. तेव्हा आमच्या सोसायटीत गणपती यायचा. सोसायटीत गणेशोत्सव साजरा करताना मला वाटू लागलं, आपणही आपल्या घरी गणपती आणावा, मग तो विचार अमृताला बोलून दाखवला”
अमृता-हिमांशूचे लग्न व्हायच्या अगोदर गेली काही वर्ष ते एकमेंकांना डेट करत आहेत. त्यामूळे हे तर सहाजिकच होतं, की दिल्लीत लहानाचा मोठा झालेला पंजाबी हिमांशूला आस्था असली तरीही ह्या उत्सावाच्या बारकाव्याबद्दल माहिती नव्हती. जी अमृताने त्याला करून दिली.
अमृता म्हणते, “हो, ह्याला गणपती आणायचा फारच उत्साह होता. तो पाहून, मी त्याला ह्या उत्सवाची सात्विकताही समजावून सांगितली. एकदा आणला की, तो दरवर्षी आणावा लागतो. आणि मग मनाला येईल तसा वेगवेगळे दिवस तो बसवायचा, किंवा मग कधी वेळ नाही म्हणून नाही बसवायचा, असे चालणार नाही, हे मी त्याला सांगितले. पण तो खूप उत्साही दिसला. मग मी त्याला त्यावर्षीपासून मदत करू लागले.”
ती आपली लहानपणीची आठवण सांगू लागते, “मला लहानपणी गणपती आपल्याकडे असावा, असं हौसेने वाटायचे. पण घरात मी, माझी बहिण आणि आई अशा तीन बायका आणि वडिल असायचो. तर वडिलांनी मला समजावून सांगितलं, की जर आपल्याला बाप्पाचे सोवळे नाही पाळता आले, काही चूक झाली, तर? त्यापेक्षा नकोच. ती इच्छा तशीच मनात राहिली होती. आणि पाच वर्षापूर्वी हिमांशूने माझ्या मानतलीच इच्छा पून्हा बोलून दाखवली.”
हिमांशू गणेशोत्सवाबद्दल म्हणतो, “गणपती घरी आला की घर एकदम पवित्र वाटू लागतं, हे मी जेव्हा दूस-यांच्या घरी गणेशोत्सवात जायचो, तेव्हा अनुभवलं. आणि मग ते पावित्र्य माझ्याही घरी यावं, ही माझी इच्छा होती. गणपती आला की त्या आडाने मित्र-परिवार घरी येतो. बाकीवेळी ज्यांना आपल्याला भेटता येत नाही, त्यांना आपण गणेशोत्सवात भेटतो.”
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण करतं भकित-भावाने पूजा अमृता की हिमांशू?