आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Gauri Pujan: खीर, शिंगडी, रवाळं, उंबर, गुरवळीची मेजवानी स्मिता जयकरांच्या गौरीसाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या पेडर रोडवर जयकरांच्या घरी गेली दिडशे वर्ष तेरड्याच्या गौरी पूजनाला आजूबाजूच्या सासूरवाशीणी आणि माहेरवाशिणींना आमंत्रण असते. तेरड्याच्या गौरीला सोनेरी मुखवटा, भरजरी साडी, सांलकृत दागिने असे सगळे सोपस्कार केले जातात.
आपल्या गौरी पूजनाचे वैशिष्ठ्य सांगताना स्मिता जयकर म्हणतात, “आमची देवी तेरड्याची आहे. तेरड्याचे रंग तीन दिवस. गौरीही तीनच दिवसांसाठी येते. तेरडा तीन दिवस छान टिकतो. त्यामूळे तेरड्याची गौरी बनवण्याची प्रथा आहे. माहेरी आलेल्या मुलीचे जसे कौतुक करतात. तिला सगळं सुग्रास जेवणं जेवायला देतात. तसं जेवण आम्ही घरी बनवतो. खीर, शिंगडी, रवाळं, उंबर, गुरवळी, अळूवडी, भाज्या, भात, वरण, कोशिंबीर असे अनेक प्रकार तिच्यासाठी केले जातात. आमच्या सगळ्यांच्याच मित्र-मैत्रिणींना आमंत्रित केलं जातं. माझ्या मैत्रीणींमध्ये रती अग्निहोत्री, शम्मी कपूर ह्यांची पत्नी ह्या दोघीही दर गौरी पूजनाला आवर्जुन येतात.”
स्मिता जयकरांच्या घरी आलेल्या सेलेब्समध्ये बॉलीवूड अभिनेता अश्मित पटेल आणि त्याची आई आशा पटेल आल्या होत्या. अश्मितला गौरी पूजनाबद्दल विशेष काही माहित नव्हतं. पण ही देवी नवसाला पावणारी आहे. हे कळताच त्याने देवीकडे काहीतरी मागितलं. तर त्याची आई म्हणते, “अश्मितला मी पहिल्यांदाच घेऊन आलीय. पण मी गौरीपूजनाला ह्याअगोदर आलीय. आणि ही नवसाला पावणारी देवी असल्याने इथे मी आवर्जून येते.”
स्मिता जयकरांची जाऊबाई एडव्होटकेट केतकी कोठारे- जयकर सांगतात,” आमच्या घरी तांदळाचा गणपती बसतो. पाटावर एक टिपरी तांदूळ घेऊन गणपती काढायचा, त्याची पूजा करायची आणि मग त्याचदिवशी संध्याकाळीच त्याचे विसर्जनही आम्ही करतो. तर देवी बसवताना पुरूष मंडळी तेरड्याची रोप आणून त्याला व्यवस्थित आकार देतात. आणि मग सोन्याच्या मुखवट्यापासून ते दागिन्यांपर्यंत बाकीचे सोपस्कार आम्ही करतो. काही ठिकाणी गौरीसोबत तिची मैत्रिण येण्याची प्रथा आहे. तर आमच्याकडे गौरीसोबत तिचा दीर येतो. त्यालाही तेरड्याच्या रूपातच आम्ही पूजतो. विसर्जनावेळीही माहेरवाशिणीला दही-भाताची शिदोरी दिली जाते.”
स्मिता जयकरांची सून श्रेष्ठा जयकर म्हणते, " जयकरांच्या घरी गौरीपूजनाची एक वेगळी परंपरा आहे. आणि तुम्ही इतरवेळी कितीही मॉडर्न असा, देवी येते तेव्हा पारंपरिक पध्दतीनेच पाहूण्यांचे स्वागत हळदी-कुंकू लावून होते. माझ्या सख्या आणि चुलत सासूसोबतच सगळ्या नणंदा, लेकी, सूना नाकात पारंपरिक मोठी नथ घालूनच आणि पारंपरिक मराठी दागिने घालूनच वावरतो."
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी केली जाते जयकरांकडे गौरीपूजा