आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Home: पाहा, Choreographer उमेश जाधवचे Dream Home

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येकासाठीच आपलं ‘ड्रीम होम’ खूप खास असतं. मराठी फिल्म इंडस्ट्रीचा फेवरेट कोरीओग्राफर उमेश जाधवने अनेक वर्ष बाळगलेलं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण केलं. आता त्या गोष्टीला १५ वर्ष होऊ गेलीयत. पण अजूनही ह्या ड्रीम होमला सजवणं, हा उमेशचा फेवरेट छंद आहे. उमेश जाधव सांगतोय आपल्या ड्रीम होमचं वैशिष्ठ्य...
उमेश जाधव -
माझं लहानपण ताडदेवमध्ये गेलं. आमच्या ताडदेवमधल्या छोट्याशा घरात मी लहानाचा मोठा होतं, असतानाच माझं स्वत:च मुंबईत टीबीएचकेचं घरं असावं, असं स्वप्न होतं. 1999ला हे घर मी घेतलं. हे घर घेण्याअगोदर जवळ-जवळ मी ३०० ते साडेतीनशे फ्लॅट्स पाहिले होते. एवढे फ्लॅट्स दाखवता-दाखवता माझा एजन्टही मला वैतागला होता. पण मध्यमवर्गीय माणूस एकदाच घर घेतो. आपलं स्वत:च मुंबईतलं घर कसं असावं त्याचं माझ्या मनात एक स्वप्न होतं. ते सत्यात उतरवताना मी खूप चूझी झालो होतो. हे घर जेव्हा घ्यायला आलो. तेव्हा माझ्याकडे धड पैसेही नव्हते. कसेबसे वन बीएचकेचेच पैसे साठले होते. पण मला हेच घर पसंत पडले. माझी धडपड बहूधा आमच्या बिल्डरलाही दिसून आली. त्याने मला समजवून घेतले. त्यानेच मग मला हा आवडलेला फ्लॅट माझं घर बनावा म्हणून थोडा पुढाकार घेतला.
डिसेंबर २०००मध्ये माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बायकोचा गृहप्रवेश झाला तोही ह्याच फ्लॅटमध्ये. लग्नानंतर खरं तर एक कपबशी घेण्याइतपतही पैसा गाठीशी नव्हता. कारण सगळी जमापूंजी मी ह्या घरासाठी आणि उरलेली रक्कम लग्नासाठी वापरली होती. तरीही बायकोने साथ दिली. घराला पडदेही नव्हते. टिव्ही घ्यायला मग सहा महिने लागले. पण आपण कोणाचीही मदत न घेता घेतलेलं आपलं हे घर आहे, ह्याची जाणीव काही औरच होती.
आता गेल्या पंधरा वर्षात मी हळूहळू माझं घर सजवलंय. माझ्या घराचं इंटेरीयर कोणत्याही इंटीरीयर डिझाइनरने केलेलं नाही. मी माझ्या हाताने, अभ्यापूर्वक आणि जाणीवपूर्वक घरं सजवलंय. आम्ही गेल्या पंधरा वर्षात जिथे जिथे गेलो, तिथल्या आठवणी घेऊन आलो. कधी बँकॉक, तर कधी मलेशिया, काही लडाख तर काही इजिप्तवरनं आणलेले एन्टिकपिस. मग ते जयपूर असो की फुकेत, जगात मी कुठेही गेलो, तरी माझं घर सतत माझ्या मनात असतं. आणि जिथून कुठून मला माझ्या घरासाठी काहीतरी एन्टिक गोष्ट घेऊन येता येईल. ती मी आणतो.
(फोटो- अजित रेडेकर)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, उमेश जाधवच्या घराचं वैशिष्ठ्य