आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Home: कसे असावे, child Friendly होम सांगतायत Filmmaker श्रावणी देवधर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घर हे बाईचं व्यक्तिमत्व दर्शवतं असं म्हणतात. मोठमोठ्या मानाच्या पदांवर असलेल्या स्त्रियांच्या मनातही आपल्या घराविषयी मनात कायम जिव्हाळा राहिलाय. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त फिल्ममेकर आणि स्टारप्रवाहच्या क्रिएटीव्ह डायरेक्टर सारखं पद भूषवलेल्या श्रावणी देवधर ह्यांनीही आपल्या करीयरच्या जबाबदा-या सांभाळत आपलं घरकुल सजवलंय. जेवढ्या क्रिएटिव्ह त्यांच्या फिल्म्स असतात. तेवढ्याच क्रिएटिव्हीटीने त्यांनी घरातला प्रत्येक कोपरा लक्षणीय असण्यावर भर दिलाय. त्यांच्या घराविषयी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात –
श्रावणी देवधर –
मी लग्नानंतर महाराष्ट्रीयन झाले. पण मी मुळची बंगाली. बंगाली लोकांमध्ये कलात्मक नजर उपजतच असते, असं म्हणतात. तसंच माझं असावं. जेव्हा कमी पैशात घर चालवतं होते, तेव्हाही घर नीटनेटकं आणि आखीव-रेखीव असावं, ह्यावर माझा भर असायचा. बाईचं सर्वस्व घर असतं, हे आपण मानतो. माझंही तसंच आहे. मी जर फिल्ममेकर झाले नसते, तर इंटिरीयर डेकोरेटर झाले असते. कारण मला घर सजवायला खूप आवडतं.
माझी पूर्वीची दोन्ही घरं मी खूप मन लावून सजवली होती. पण माझे आई-वडिल आणि पती देबू देवधर ह्यांच्या निधनानंतर मात्र मला जीवनातल्या सगळ्या गोष्टीबाबत विरक्ती वाटू लागली. मध्यंतरीच्या काळात घरासाठी, स्वत:साठी काहीच नवं घेत नव्हते. जे आहे, त्यातच निराश मनाने राहायचे. पण माझ्या मुलीला सईला माझ्या मनाची ही अवस्था नेमकी कळली. आणि मग तिने मला आत्ता मी राहतेय. त्या घरात आणलं. सईने माझ्यामध्ये पून्हा घराविषयी ओढ जागवली.
ह्या घराचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ठ्य आहे की, माझी मुलगीच माझी शेजारीण आहे. त्यामूळे मी घरात एकटी राहूनही कधी एकटी नसते. जावई आणि मुलगी येत जात असतात. त्यासोबतच ते दोघं घरी नसतील तेव्हा माझी नात नक्षत्र माझ्याच घरी असते.
पूर्वीच्या माझ्या घरात अनेक एन्टिक गोष्टी होत्या. पण नव्या घरात येताना, त्यातली एकही गोष्ट मला सईने सोबत आणू दिली नाही. ह्याच कारण होतं, त्या प्रत्येक गोष्टीशी निगडीत माझ्या आणि देबूच्या आठवणी होत्या. ‘बाबांशिवाय जगताना, आता नव्या आयुष्याची सुरूवात कर, त्याच्या आठवणींमध्ये राहिलीस तर अशीच नैराश्याच्या गर्तेत खोल रूतत राहशील’, हा तिचा त्यामागचा दृष्टीकोण होता.
(फोटो- अजित रेडेकर)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, श्रावणी देवधर ह्यांच्या घराचं वैशिष्ठ्य