आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sai Tamhankar, Spruha Joshi And Many More Marathi Celebrity On Crow Calendar 2015

थाटात पार पडला \'सेलेब्रिटी कावळे कॅलेंडर 2015\'चा लाँचिंग इव्हेंट, पाहा क्षणचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठमोळा तरुण सुमित पाटीलच्या संकल्पनेतून आकारास आलेले 'सेलेब्रिटी कावळे कॅलेंडर 2015' नुकतेच लाँच करण्यात आले. मुंबईत दणक्यात हा प्रकाशसोहळा पार पडला. किरण शांताराम यांच्या हस्ते हे कॅलेंडर लाँच करण्यात आले. यावेळी मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
काकप्रेमी असलेल्या सुमीतने मराठीतील प्रसिद्ध 24 सेलिब्रिटींना घेऊन केले कॅलेंडर तयार केले आहे. सुमितच्या या कॅलेंडरचे नाव आहे. सुमितच्या कॅलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेले कावळे. सई ताम्हणकर, अभिजीत खांडकेकर, जयवंत वाडकर, स्पृहा जोशी, सुलेखा तळवलकर, कुशाल बद्रिके, तन्वी पालव या कलाकारांसह अनेक प्रसिद्ध चेहरे या कॅलेंडरवर झळकले आहेत.
छायाचित्रण, नेपथ्य, वेशभूषा, चित्रकला, काव्य, कलादिग्दर्शन म्हणून ओळखला जाणा-या सुमित पाटीलने तयार केलेले हे कॅलेंडर अलीकडेच प्रकाशित करण्यात आले आहे. या कॅलेंडरवर मराठीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबतच, संगीतकार, गायक, पत्रकार, खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे.
स्लाईड्समध्ये पाहा लाँचिंग इव्हेंटची खास क्षणचित्रे