आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहिहंडी : काही मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी सेलिब्रिटी घेतात लाखांची सुपारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अवघ्या महाराष्ट्रात आज दहिहंडीची धूम सुरू आहे. दहिहंडीचा हा उत्सव ज्याप्रमाणे राजकीय नेत्यांसाठी चर्चा एकवटण्याची किंवा प्रचाराची संधी असते, त्याचप्रमाणे सेलिब्रिटींसाठीही हा उत्सव पर्वणी ठरत असतो. दहिहंडीच्या या एका दिवसात काही सेलिब्रिटीतर लाखोंची कमाई करतात. आमच्या विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून याबाबत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. 

दहिहंडीच्या दिवशी विविध राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. या कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक गर्दी खेचून आपल्या भागामध्ये प्रचार करता यावा यासाठी राजकीय मंडळी सेलिब्रिटींना बोलावत असतात. मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटी अशा कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तर मराठी सेलिब्रिटींना बोलावण्यावरही अधिकाधिक भर दिला जात असतो. मराठी सेलिब्रिटींमुळे जास्त प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यश मिळेल हा त्यामागे उद्देश असतो. या दिवशी टीव्ही मालिकांमध्ये झळकणाऱ्या सेलिब्रिटींनाही खास डिमांड असते. काही मिनिटांसाठी हे सेलिब्रिटी लाखो रुपये आकारत असतात अशी माहिती आमच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्यातही कलाकारांनुसार रक्कम वेगवेगळी असते. बॉलिवूड, मराठी, ए लिस्टर्स, बी लिस्टर्स यांच्यानुसार कलाकारांना रक्कम मिळत असते. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सेलिब्रिटी किती कमावतात दहिहंडीच्या कार्यक्रमात..
(Photos for Presentation only)
 
बातम्या आणखी आहेत...