आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs Are Excited For Dil Dosti Duniyadari Season 2

‘दिल दोस्ती…’च्या Season 2 साठी Excited आहेत Celebs

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या रॉक कॉन्सर्टवेळी मालिका तात्पुरती आवरती घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय माजघरातल्या दोस्तांनी जाहिर केला. आणि समोर उभे असलेले यंगस्टर्स अवाक झाले. रॉक कॉन्सर्टमध्ये आलेल्या प्रत्येकासाठीच जाताजाता ‘दिल दोस्ती..’च्या टीमने दिलेला हा जोर का झटका अनपेक्षित होता. फक्त सामान्य लोकांचीच नाही तर अनेक सेलेब्सचीही दिल दोस्ती दुनियादारी आवडती मालिका असल्याने त्यांनाही मालिका विश्रांती घेत असल्याने वाईट वाटलं. पण मालिकेच्या दुस-या पर्वाचीही घोषणा कॉन्सर्टमध्येच झाली. आणि त्यासाठी आता सेलेब्स एक्साइटेड आहेत.
नेहमी पाश्चिमात्य मालिका रस घेऊन पाहणा-या सुयश टिळकला हा बदल तर स्वागतार्हच वाटतो. तो म्हणते, “जेव्हा पासून ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सुरू झालंय. तेव्हापासून ह्या मालिकेशी प्रेक्षक खूप बांधले गेलेत. आता त्यांचं पहिलं पर्व संपतंय. आणि काही काळाने ते दुस-या पर्वासह परतणार आहेत. असा प्रकारचा मराठीत पहिलाच प्रयोग आहे. पाल्हाळ न लावता मालिका बंद करणं, आणि ब्रेकनंतर एका वेगळ्या एनर्जीसह, कथानकासह येणं हे क्रिएटिव्हली खूप चांगलं असतं. असे ट्रेन्ड परदेशात सुरू आहेत. मी इंग्लिश टेलिव्हीजन शोज पाहतो. ‘सुट्स’, ‘लॉस्ट’ माझे फेवरेट शो आहेत. ते सहा सहा महिन्यांनी परततात. तेव्हा पाहणं खूप रिफ्रेशिंग असतं. आणि हा ट्रेन्ड मराठीत येतोय. हे स्वागतार्हच आहे.”
सुरूची आदारकरसाठी मात्र मालिका बंद होणं, हे धक्कादायकच होतं. ती ‘दिल दोस्ती..’ मालिका नियमीत पाहते. सुरूची म्हणते, “ही मालिका एवढी छान चाललीय, की, ती बंद होणं हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. मला ही मालिका खूप आवडते. जेव्हा मला वेळ मिळतो. तेव्हा ही मालिका मी जरूर पाहते. पण एक चांगली गोष्ट आहे, की ते सिझन २ घेऊन मालिकेचे निर्माते येतायत. त्यामुळे पून्हा एकदा ह्या कलाकारांची धमाल एका ब्रेकनंतर अनुभवायला मिळणार आहे.”
चिन्मय उदगीरकरही ह्या दुस-या पर्वाविषयी उत्सुक आहे. तो म्हणतो, “एका अल्पविरामानंतर मालिकेचे दुसरं पर्व येतंय. मराठीमध्ये एका लग्नाची गोष्ट ची पर्व आली होती. पण त्यात दरवेळी कथानक, पात्र, कलाकार सगळंच बदलंल. ही मात्र त्याच पात्रांसह आणि कलाकारांसह वेगवेगळे सिझन्स घेऊन येणारी मराठीतली पहिली मालिका आहे, पुढच्यावेळी कदाचित अजून काही चेहरे ह्यात पाहायला मिळतील. त्यामुळे टेलिव्हीजनवरचा हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिल दोस्ती दुनियादारीच्या ऱक क़ॉन्सर्टमधले काही अविस्मरणीय क्षण