आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाचा सलमान खान का म्हणाला, बंद करा \'चला हवा येऊ द्या...\' जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवुडचा भाईजान आणि दबंग खान अशी ओळख असलेला सुपरस्टार सलमान खानही झी मराठीच्‍या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. नुकत्‍याच झालेल्‍या या शोमध्‍ये त्‍याने धम्‍माल तर, केली पण काही ठिकाणी त्‍याचा भावूक चेहराही पाहायला मिळाला. सुल्‍तान चित्रपटानिमित्‍त्‍ा सलमान या शोमध्‍ये आला होता. यावेळी एका नाट्यात भारत गणेशपुरे न्यायाधीशांच्या भूमिकेत होते. त्यात संवाद सुरु असताना ते ऑर्डरच्या ऐवजी क्वॉटर क्वॉटर म्हणतात. त्यावर सलमान खुप हसतो. म्हणतो, आता शो बंद करा. घरी जाऊयात...
'बाप की अदालत'मध्ये सलमानवर विविध आरोप..
चला हवा येऊ द्या या शोमध्‍ये थुकरटवाडीतील 'बाप की अदालत'मध्ये सलमानला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले होते. यावेळी सलमानवर अनेक मजेदार आरोपही करण्यात आले. त्‍याने तेवढीच धम्माल उत्तरेही दिली. सरकारी वकीलाच्या भूमिकेत असलेल्या कुशलच्या धमाकेदार एन्ट्रीला सलमानने खळखळून दाद दिली.
भाऊ कदम यांनी केला 'मैने ट्राय किया'..
सलमानसारख्‍या अभिनेत्‍यासमोर थुकरटवाडीतील मंडळी शांत कशी बसणार. सलमान खानने ज्या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण केले त्‍या मैने प्यार किया या चित्रपटावर आधारित मैने ट्राय किया हे धम्माल स्किट थुकरटवाडीतील मंडळींनी केले. प्रेमची भूमिका साकारलेल्‍या भाऊ कदम यांनी प्रेक्षकांना लोटपोट करुन सोडले. तर सुमनची भूमिका श्रेया बुगडेने केली. आपल्या चित्रपटाचे हे नवीन रूप पाहून सलमानही लोटपोट झाला होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अशी झाली धमाल, काय म्‍हणाला सलमान..
मराठीत काम करण्‍याची व्‍यक्‍त केली इच्‍छा.
सलमान म्‍हणाला- माझी मराठी वाईट..
सैराटसह या मराठी चित्रपटांचे केले कौतुक..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...