आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

It\'s Party Time : \'चला हवा येऊ द्या\'ची यशस्वी शंभरी, विनोदवीरांनी केला एकच जल्लोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'चला हवा येऊ द्या\'च्या सेटवर सेलिब्रेशन करताना सेलिब्रिटी - Divya Marathi
\'चला हवा येऊ द्या\'च्या सेटवर सेलिब्रेशन करताना सेलिब्रिटी
झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 'चला हवा येऊ द्या' या शोने शंभर भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्ताने या शोच्या संपूर्ण टीमने सेटवर एकच जल्लोष केला. केक कापून सर्व सेलिब्रिटींनी मालिकेचे यश साजरे केले. यावेळी निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, सागर करंडे, भारत गणेशपुरे हे सेलिब्रिटी सूटबूटात सेटवर अवतरले. तर अभिनेत्री श्रेया बुगडे रेड कलरच्या गाऊनमध्ये अतिशय सुंदर दिसली.
18 ऑगस्ट 2014 रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी ‘चला हवा येऊ द्या..’चा पहिला ‘एपिसोड’ लोकांनी पाहिला. लेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्ते डॉ. नीलेश साबळेने पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला. त्याच्या या 'मॅड फॅमिली'मध्ये भाऊ कदम, कुशल बद्रीके, सागर करंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आणि मानसी नाईक सारख्या धम्माल सदस्यांचा समावेश आहे. या फॅमिलीमध्ये मराठी सिनेमे आणि नाटकांतील अनेक सेलेब्रिटी पाहूणे म्हणून येत असतात. या फॅमिलीची या पाहुण्यांसोबत उडणारी धमाल या कार्यक्रमातून प्रेक्षकांना बघायला मिळत असते.
आता शंभराव्या भागानंतर सिनेमे आणि नाटकांव्यतिरिक्त इतर क्षेत्रांसाठीही ‘थुकरटवाडी’चं हे कॅफे खुले होणार आहे. कदाचित ‘कॅफे’चे इंटेरियर’ ही ‘रिनोव्हेट’ होईल आणि ‘कॅफे’च्या मसालेदार ‘मेन्यू’मध्ये आणखी काही चमचमीत भरसुद्धा पडण्याची शक्यता आहे .
एकंदरीतच या कलाकारांची परफेक्ट कॉमिक टायमिंग सोमवार आणि मंगळवार प्रेक्षकांना रिफ्रेश करते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
चला तर मग 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर या कलाकारांनी केलेल्या सेलिब्रेशनची खास झलक पाहुयात, पुढील स्लाईड्समध्ये...