आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zee Marathi Popular Show Chala Hawa Yeu Dya Completed 50 Episodes

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ची पन्नाशी, \'बाजी\'च्या टीमसोबत होणार सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः ‘चला हवा येऊ द्या’ची टीम)

“नको डोक्याला शॉक, चला हवा येऊ द्या” असं म्हणत मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांच्या युगात मनोरंजनाची नवी लाट घेऊन आलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीवरील “चला हवा येऊ द्या”. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या कार्यक्रमाने यशस्वी 50 भाग पूर्ण केले आहेत. तुफान लोकप्रिय झालेल्या या कार्यक्रमाचा पन्नासावा भाग येत्या मंगळवारी 3 फेब्रुवारीला रात्री 9.30 वाजता हा प्रसारित होणार आहे.
या भागात आगामी 'बाजी' सिनेमाची टीम सहभागी झाली आहे. अमृता खानविलकर, श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी हे कलाकार थुकरटवाडी या गावातील “चला हवा येऊ द्या” या कॅफेत धमाल करणार आहेत.

मराठी चित्रपट आणि नाटकांना तिकीटबारीवर चांगले दिवस आले आहेत. यशाचे आणि लोकप्रियतेचे एकेक टप्पे हे दोन्ही माध्यमं गाठत आहेत आणि आता प्रेक्षकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. या दोन्ही माध्यमांबद्दलचं हे चित्र सकारात्मक असलं तरी अनेकदा योग्य प्रसिद्धीअभावी या कलाकृती लोकांपर्यंत नीट पोहचत नसल्याचं मत या क्षेत्रामधून व्यक्त होत होतं. अशातच झी मराठीने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पायंडा पाडणारा कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांसाठी आणला. ज्यामध्ये आगामी प्रदर्शित होणा-या चित्रपटातील आणि रंगभूमीवर नव्याने आलेल्या नाटकातील कलावंत ‘चला हवा येऊ द्या’ या कॅफेत येऊन आपल्या चित्रपट किंवा नाटकाबद्दलची माहिती देऊ लागले. याला सोबत होती ती कॅफेचा मालक आणि निवेदक डॉ. निलेश साबळे आणि त्याच्या परीवारातील अतरंगी कलाकार म्हणजे भारत गणेशपुरे, कुशल बद्रीके, सागर कारंडे, मानसी नाईक, श्रेया बुगडे, विनित बोंडे आणि भालचंद्र (भाऊ) कदम यांची. कधी धम्माल स्किट्सच्या माध्यमातून या सर्वांनी प्रेक्षकांना हसवलं तर कधी काही हळव्या आठवणींनी प्रेक्षकांना भावूकही केलं.
पुढील स्लाईडमध्ये पाहा ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमसोबत 'बाजी'च्या कलाकारांची झलक...