आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुशल म्हणतो, \'होय.. मी आहे बायकोचा बैल\', अशी आहे दोघांची LOVE STORY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुशलने बैल पोळ्याच्या निमित्ताने केलेली ही खास कविता त्याच्याच शब्दांत... - Divya Marathi
कुशलने बैल पोळ्याच्या निमित्ताने केलेली ही खास कविता त्याच्याच शब्दांत...
'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पोटधरुन हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके एक उत्तम कवीसुद्धा असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? होय.. कुशल एक उत्तम कवी आहे आणि याची प्रचिती आज म्हणजेच खास बैल पोळ्याच्या निमित्ताने आली आहे. खास बैल पोळ्याच्या निमित्ताने कुशलने त्याची पत्नी सुनयना हिच्यावर एक कविता लिहिली असून या कवितेत कुशल स्वतःला मी आहे बायकोचा बैल असे म्हणतोय. अचंबित झालात ना... पोळ्याच्या निमित्ताने कुशलने एका खास कवितेच्या माध्यमातून "माझ्यासारख्या सगळ्या बायकोच्या बैलाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा" ,  असे म्हटले आहे.
 
उल्लेखनीय म्हणजे सुरुवातीला कविता विनोदी वाटत असली तरी या कवितेतून कुशलने एक पत्नी पतीमागे खंबीर कशी उभी राहते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या कवितेच्या माध्यमातून कुशलने त्याची पत्नी सुनयनावरचे प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त केले, असे म्हणायला हरकत नाही.
 
आपल्या परफेक्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखल्या जाणा-या कुशलची पत्नी सुनयना एक कथ्थक नृत्यांगणा आहे. या दोघांच्या लग्नाला यावर्षी 30 एप्रिल रोजी 8 वर्षे पूर्ण झाली असून त्यांना एक मुलगा आहे. कुशल आणि सुनयनाचे लव्ह मॅरेज आहे. पण सहजासहजी लग्नाला होकार मिळाला तर मग मजा ती काय... या दोघांच्या लग्नाला घरच्यांचा नकार होता. मग सुनयनासोबत कुशलचे लग्न कसे झाले, हे स्वतः कुशलने एका मुलाखतीत सांगितले आहे.  
 
चला तर मग जाणून घेऊयात, कशी सुरु झाली सुनयना आणि कुशलची लव्ह स्टोरी आणि हे दोघे कसे पोहोचले लग्नमंडपात पण त्यापुर्वी दुस-या स्लाईडवर कुशलची कविता ऐकायला विसरु नका...   
 
बातम्या आणखी आहेत...