आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Leaked: पहिल्या एपिसोड अगोदरच लीक झाले फोटो, आणि स्पर्धकांची लिस्ट

5 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
‘ढोलकीच्या तालावर’ ह्या कलर्स मराठीच्या नव्या डान्स रिएलिटी शोची आजपासून सुरूवात होतेय. पण ह्या शोचा पहिला एपिसोड टेलिकास्ट होण्याअगोदरच ह्या शोचे काही फोटो आणि ह्या रिएलिटी शोमधल्या स्पर्धकांची यादीही divyamarathi.comच्या हाती लागली आहे.
ह्या रिएलिटी शोसाठी महाराष्ट्राच्या काना-कोप-यातून लावणीची आवड असलेल्या मुलींना निवडण्यात आलंय. एवढंच नाही, तर ह्या सर्व मुलींनी आपापल्या शहरात लोकांच्या गर्दीत लावणी सादर केलीय. कोणी मॉलमध्ये, तर कोणी भाजीमार्केटमध्ये, कोणी बसस्टँडवर तर कोणी रेल्वेस्टेशनवर लावणी सादर केलीय. महाराष्ट्रातल्या बारा गावच्या बारा मुली त्यांच्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणार आहेत.
ही आहे, ह्या बारा स्पर्धक मुलींची लिस्ट -
 1. शर्मिला शिंदे – नारायणगाव
 2. मृण्मयी गोडबोले- पूणे
 3. नाझनीन शेख- अकळुज
 4. शुचिता जोशी – हुबळी
 5. रिचा अग्निहोत्री – ठाणे
 6. वैष्णवी पाटील - पूणे
 7. सानिका अभ्यंकर – नागपूर
 8. ऐश्वर्या बदाडे – सासवड
 9. सायली पराडकर – लांजा, रत्नागिरी
 10. मीरा जोशी – रत्नागिरी
 11. चानी इलोडी रोजेरो – स्पेन, फ्रान्स
 12. अक्षया मालवणकर – विरार, मुंबई
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणतोय सूत्रसंचालक सुबोध भावे आणि ‘हॉट’ परिक्षक मानसी नाईक आणि दिपाली सैय्यद
बातम्या आणखी आहेत...