आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्रीस खेळ चालेच्या शतकपूर्तीचे झाले सेलिब्रेशन, २०० भागांनंतर संपणार मालिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्रीस खेळ चाले मालिकेला नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. मालिका सुरू झाल्यापासून त्याविषयी अनेक ब-या-वाईट चर्चा झाल्या. ही मालिका सुरू रहावी की बंद व्हावी ह्याविषयी राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामूळे मालिकेविषयी अजूनच उत्सुकता वाढली. आणि पाहता पाहता, मालिकेने चक्क शतक पूर्ण केलं.
ह्या शतकपूर्तीनंतर मालिकेच्या कलाकारांनी नुकतंच सेलिब्रेशन केलं. आणि सेलिब्रेशनवेळी मालिकेचे संतोष अयाचित ह्यांनी मालिका २०० भागांनंतर संपणार असल्याचीही घोषणा केली.
Divyamarathi.comशी बोलताना संतोष अयाचित म्हणाले, “हॉरर आणि सपेन्ससोबतच रात्रीस खेळ चाले ही मालिका खरं तर, नातेसंबंधांची कथा आहे. त्यामूळेच कदाचित ह्या मालिकेला यश मिळालं. आणि त्याचे शंभर भाग पूर्ण होऊ शकले. मालिकेविषयी कॉन्ट्रोव्हर्सी झाल्यवर आम्ही चित्रीकरण सुरू ठेवलं. मुंबई बाहेर राहून ८०-९० लोकं ५० दिवस सलग चित्रीकरण करतात, हा मराठीतला एक रेकॉर्ड आहे, असं मला वाटतं. मालिकेचा सुवर्णमध्य झालाय. आणि मालिकेचा शेवट काय असेल ते ही नक्की झालंय. त्यामूळे २०० भागांनंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल.”
मालिकेत नीलीमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची नील म्हणते, “मालिकेला काही लोकं वाईट म्हणतात. पण वाईट म्हणण्यासाठीही ती मालिका पाहतात, हेही नसे थोडके. मालिकेविषयी गेले तीन-साडेतीन महिने सतत प्रतिक्रिया येतायत. नीलीमा सायन्टिस असल्याने ती भूताखेतांवर विश्वास ठेवत नाही, ह्याचा काहींना आनंद वाटतो. तर काही लोकं मला समजावयाला येतात. "
“सावंतवाडी तर एप्रिल-मे महिना टुरिस्ट स्पॉट बनला होता. लोकं आम्हांला भेटायला, आमच्यासोबत सेल्फी काढायला, प्रश्न विचारायला यायचे. शेवटी प्रॉडक्शनला तारेचं कुंपण घालून लोकांना आडवावं लागलं. आम्ही सिध्दीविनायक देव असल्यासारखे मोठ-मोठ्या रांगा आमच्या सेटच्या बाहेर लागलेल्या आम्ही पाहिल्यात. त्यामुळे १०० एपिसोड्सचा हा प्रवास खरंच अविस्मरणीय होता.”
मालिकेतली पांडूची भूमिका खूप लोकप्रि. झाली. ही भूमिका साकारणारा अभिनेता प्रल्हाद कुडतरकर म्हणतो, “कोकणातल्या अनेक गावांमध्ये असे पांडू तुम्हांला सापडतील. थोडासा निरागस, थोडासा मजेशीर, थोडासा भावूक असलेला पांडू लोकांना आवडतोय. उषा नाडकर्णींसह अनेक ज्येष्ठ कलावंतांनी माझं कौतुक केलंय. आत्तापर्यंत लेखक म्हणून माझी ह्या क्षेत्रात ओळख होती. पण ख-या अर्थाने पांडूने मला जनमानसात लोकप्रिय केलं.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रात्रीस खेळ चालेच्या पार्टीत झालेले सेलिब्रेशन
बातम्या आणखी आहेत...