आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out The Pictures Of Colors Marathi Gudhipadwa Party

Party: कलर्स मराठीच्या कलाकारांनी विकेन्डला साजरी केली गुढीपाडवा पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स मराठी वाहिनीवरच्या वेगवेगळ्या मालिकांमधल्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी क्वचितच मिळते. नुकत्याच झालेल्या गुढीपाडवा पार्टीमूळे ह्या सगळ्या कलाकारांना एकत्र पार्टी करताना पाहता आलं. गणपती बाप्पा मोरया, तू माझा सांगाती, दर्शन, सरस्वती, कमला, असं सासर सुरेख बाई, ढोलकीच्या तालावर आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन ह्या मालिकांमधल्या कलाकारांनी ह्या पार्टीत मस्त एन्जॉय केलं.
कलर्ससाठी गुढीपाडवा खूप खास आहे. कारण गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या वेळीच इटीव्ही मराठीचं नामकरण कलर्स मराठी असं झालं. वाहिनीला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमीत्ताने आणि गुढीपाडव्याच्या निमीत्ताने कलर्स मारठीच्या मालिकांमधल्या सर्व कलाकरांचा तुळशी वृंदावन देऊन सन्मान करण्यात आला. आणि त्यानंतर पार्टीला सुरूवात झाली.
पार्टीत कोणी सेल्फी क्लीक करण्यात बिझी होतं, तर कोणी डान्स करण्यात तर कुठे गप्पांचा फड रंगला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कलर्स मराठीच्या पार्टीत दिसलं मालिकेतल्या कलाकांरांच ग्लॅमरस रूप
( फोटो - स्वप्निल चव्हाण)