आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: पहिल्या पावसात फुललं शिव-गौरीचं प्रेम, गौरीनं केला प्रेमाचा स्विकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवला गौरी आवडलीय. आणि गौरीलाही शिव आवडू लागलाय. पण अजून त्यांचं प्रेम तसं अव्यक्तचं राहिलंय. पण आता पहिल्या पावसाच्या सरींसोबत त्यांचं प्रेमही फुलणार आहे. शिव आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात भिजणार आहेत. आणि त्यांचा रोमँस आता ख-या अर्थाने सुरू होणार आहे.
शिव-गौरीच्या रोमँटिक डेटसाठीच्या गाण्याचं नुकतंच चित्रीकरण झालं. पावसाच्या सरींवर सरी एकिकडे बरसत होत्या. आणि एकिकडे शिव-गौरी एकमेकांवर प्रेमाची बरसात करत होते.
पावसात चिंब भिजलेली सायली संजीव म्हणाली, “मला पाऊस खूप आवडतो. त्यामुळे सिरीयलच्या शुटिंग निमीत्ताने पावसात भिजायला मजा येतेय. माझी खूप इच्छा होती, एक पावसातलं रोमँटिंक गाणं करायला आपल्याला मिळावं. आणि ती इच्छा आता पूर्ण होतेय. गौरीला शिवसोबत पावसात भिजायला जेवढी मजा येत असेल. तेवढीच मलाही येतेय. तसंही कोणाही मुलीला प्रेमात पडल्यावर ‘त्या’च्यासोबत पावसात भिजायला नक्कीच आवडेल.”
ह्या रोमँटिक सिक्वेन्सबद्दल सायली सांगते, “शिवच्या प्रेमात गौरी खूप अगोदरच पडली होती. पण तिच्या मनातल्या भावना तिने शिवला सांगितल्या नव्हत्या. ते दोघं पहिल्यांदाच बाहेर फिरायला आल्यावर अचानक पाऊस आलाय. गौरी पावसात छान ती भिजलीय. पावसात भिजता भिजता जरी तोंडाने बोलून आपल्या मनातल्या भावना गौरी व्यक्त करत नसली तरीही डोळ्यांनी, इशा-याने ती शिवशी बोलतेय. पावसात गौरी-शिवचं प्रेमही बहरतंय. आणि ते आता फुलताना तुम्हांला ह्या पुढच्या एपिसोड्समध्ये दिसेल.”
हा रोमँटिक गाण्यामध्ये गौरी फुटबॉल खेळलीय. ती पावसात खूप नाचलीय. शिव मात्र एका हातात छत्री घेऊन गौरीकडे पाहत राहिलाय. ह्याविषयी अभिनता ऋषी सक्सेना सांगतो,” आत्तापर्यंत मालिकेमध्ये नेहमीच शिव आपलं प्रेम व्यक्त करत होता. शिवचं बोलतोय. तोच कविता म्हणतोय. पण आत्तापर्यंत गौरीच्या मनातल्या भावना कधी शिवपर्यंत पोहचल्याच नव्हत्या. आता मात्र ह्या गाण्यात ती नजरेने शिवला होकार सांगातना दिसणार आहे. आणि शिव तिचा सहवास अनुभवताना, गोरीतल्या खेळकर निरागस मुलीच्या अजूनच प्रेमात पडताना दिसणार आहे. पहिल्या पावसात हे पहिलं प्रेम फुललंय. आणि आता गौरी-शिवचं नातं अधिक घट्ट होत जाईल.”
मुंबईकर सायली जशी पाऊस एन्जॉय करते. तसा ऋषी एन्जॉय करतो का, असं विचारल्यावर ऋषी म्हणाला, “मला पाऊस म्हटला की, क्रिकेटचं आठवतं. मी शाळेत अभ्यास कमी आणि क्रिकेट जास्त खेळलोय. आणि पावसात क्रिकेट खेळायला आम्हा मुलांना खूप आवडायचं. इतर वेळेस प्रॅक्टिस करा. किवा व्यायाम करा. असं कोणी म्हटलं की, कंटाळा यायचा. पण पावसात धावायला. खेळायला खूप आवडायचं. बाकी वेळी ग्राऊंडमध्ये धावायला सांगितलं, की कंटाळा यायचा. पण पावसात मात्र न थकता आम्ही १०-१० किलोमीटरही धावू शकायचो.”
तो पूढे सांगतो, “मी मुळचा जयपुरचा आहे. आणि जसा मुंबईत धो-धो पाऊस पडतो, तसा आमच्याकडे जयपूरला पडत नाही. पावसाळ्यात जेमतेम दहा-ते बारा दिवसचं पाऊस पडतो. त्यामूळे तिथे पाऊस पडणं ही नवलाईची गोष्ट असते. मग तिथे लोकं अगदी काम-धाम सोडून त्यादिवशी पाऊसच एन्जॉय करतात. त्यादिवशी लोकं बाहेर फिरायला निघतात. पार्टी करतात. पावसात भिजतात.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शिव-गौरीमध्ये कसा फुलला रोमँस
बातम्या आणखी आहेत...