आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out Vidya Balan\'s Reaction After Watching Her Marathi Film Ek Albela\'s Teaser

‘एक अलबेला’चा Teaser झाला रिलीज, विद्या बालन म्हणतेय, It’s Awesome

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखक,दिग्दर्शक,निर्माते स्वर्गीय भगवानदादांच्या जीवनावर बनलेल्या शेखर सरतांडेल दिग्दर्शित ‘एक अलबेला’ चित्रपटाचा फस्ट लूक ट्रेलर नुकताच लाँच झालाय. ह्या चित्रपटात अभिनेता मंगेश देसाई भगवान दादांच्या भुमिकेत आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे, अभिनेत्री विद्या बालन. विद्या ह्या चित्रपटात अभिनेत्री गीता बाली ह्यांच्या भुमिकेत आहे.
संकष्टी चतुर्थीच्या निमीत्ताने फिल्ममेकर्सनी सिनेमाचा फस्ट लूक टिझर युट्युबवरून सिनेरसिकांसाठी अनविल केला आहे. टिझरविषयी सांगताना दिग्दर्शक शेखर सरतांडेल म्हणतात, “कोल्हापूरमध्ये झालेल्या प्री-मिक्ता अवॉर्ड कार्यक्रमामध्ये सिनेमाचा फस्ट लूक अनविल झाल्यावर, नवीन वर्षातल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला आम्ही हा ट्रेलर सिनेरसिकांसाठी अनविल करायचं ठरवलं. सध्या सिनेमावर अनेकांच्या प्रतिक्रिया मला येतायत.”
“ट्रेलरमध्ये ‘लायकीपेक्षा मोठी नसतील तर ती स्वप्न काय कामाची!’ हा ‘डायलॉग आहे. तो लोकांना आवडतोय. खरं तर भगवानदादांच्या आयुष्याचंच हा संवाद सार आहे, असं म्हणायला हवं. आपल्याकडे अंथरूण पाहून पाय पसरावेत, असं म्हटलं जातं. पण भगवानदादांचा आयुष्याविषयीचा दृष्टिकोणच वेगळा होता. त्यामुळेच तर ते एवढं यश कमावू शकले. ह्यात अजून एक संवाद आहे. ‘ये फिल्म बनेंगी.. जरूर बनेंगी.’ दादांच्या आयुष्यातल्या अडचणींना आणि अडथळ्यांना मात करण्याचा विश्वासच हा संवाद सांगतो. अलबेला बनताना अनेक अडथळे आले. पण दादांनी ते पार केले. ते कसे ते ही लोकांना ह्या सिनेमातून दिसेल.”
मंगेश देसाई अगदी हुबेहूब भगवान दादा दिसण्याचं श्रेय अर्थातच मेकअप आर्टिस्ट विद्याधर भट्टे ह्यांना जातं. मंगेशचं भगवान दादामध्ये कसं रूपांतर झालं, हे सांगताना शेखर म्हणतात, “मंगेशच्या चेह-याची ठेवण, हनुवटी आणि डोळे अगदी भगवानदादांसारखे आहेत. त्यामुळे मी मंगेशची निवड केली. त्यानंतर विद्याधर दादांनी मंगेशसाठी स्पेशल वीग बनवली. ह्याशिवाय जुन्याकाळातल्या मेकअपचा त्यांनी अभ्यास केला. ब्लॅक एन्ड व्हाइट सिनेमासाठी चेह-यावर एक थर जास्त मेकअप केला जायचा. जो तुम्हांला ह्या सिनेमातून जाणवेल. भगवानदादांच्या फिल्मच्या सेट बाहेरच्या वावरासाठी सिंपल मेकअप तर फिल्म सेटवर असताना रेट्रो स्टाइलचा मेकअप आम्ही वापरला.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, विद्या बालनने कशी दिली टिझर पाहून प्रतिक्रिया