आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinmay Mandlekar On Big B\'s Footsteps, Used Prosthetic Make Up For His Next

Big Bच्या ‘पा’ फिल्मच्या Makeup Artistने बनवलं चिन्मयला ‘महानायक’, वाचा कसा झाला Makeover

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्या शुक्रवारी रिलीज होणा-या बळीराम राठोड निर्मित आणि निलेश जळमकर दिग्दर्शित ‘महानायक’ ह्या सिनेमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक ह्यांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर आपल्याला दिसणार आहे. वसंतराव नाईकांची भूमिका रंगवताना चिन्मय आणि फिल्ममेकर्ससाठी सगळ्यात आव्हानात्मक होते, ते चिन्मयचं वसंतरावांसारखं दिसणं.
म्हणूनच जसा बिग बींनी ‘पा’ चित्रपटात ऑरोची भूमिका साकारण्यासाठी प्रॉस्थेटिक मेकअपचा आधार घेतला, तसाच चिन्मयलाही घ्यावा लागला. ह्या प्रॉस्थेटिक मेकअपमूळे चिन्मय आणि वसंतराव नाईंकांमध्ये ९० टक्के साम्य दिसू लागलं खरं, पण ह्यासाठी रोज चिन्मय मांडलेकरला एका मोठ्या दिव्यातून जावं लागायचं. अभिनय करण्यापेक्षाही मेकअप करणं, हे जिकरीचं होऊन जायचं.
ह्याविषयी सांगताना चिन्मय मांडलेकर म्हणतो, “वसंतराव नाईक बनण्यासाठी आवाजाचा टोन, बॉडीलँग्वेज ह्या गोष्टींचा अभ्यास तर करावाच लागला, पण माझ्यासाठी सगळ्यात जास्त दमछाक करवणारा होता तो, मला रोज केला जाणारा मेकअप. मेकअप करायला मला रोज साडेतीन ते चार तास लागायचे. आणि काढायला एक तास. एरवी पुरूष अभिनेत्याला मेकअप करायला फक्त पाच ते दहा मिनीटंच लागतात. आणि काढायला एखादं मिनीटंही पुरेस होतं. त्यामूळे हा मेकअप करण्यासाठी बसणं म्हणजे माझ्या संयमाचीच एक प्रकारे परिक्षा होती.”
चिन्मय आपल्या मेकअपविषयी सांगतो, “बरं, तो केलेला मेकअप दिवसभर सांभाळण्याची जबाबदारी होतीच. पुसद, अकोलासारख्या भागांमध्ये ४५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये चित्रीकरण करताना फारच अवघड व्हायचं. जसं जसं वसंतरावांचं वय वाढत गेलेलं चित्रपटात दाखवलंय, तसंतसं माझे ओठ आणि डोळे सोडले तर चेह-याच्या प्रत्येक भागावर प्रॉस्थेटिक मेकअप चढत गेला. एक तर तो रबर लेटेक्सचा मेकअप असतो. तो करायला भरपूर वेळ लागतो.”
चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर म्हणतात, “ वसंतरावांचा २० वर्षापासून ते उतारवयापर्यंतचा राजकिय प्रवास दाखवताना मला विशीतला, चाळीशीतला, साठीतला असा वेगवेगळा एक्टर घेऊन सिनेमा करायचा नव्हता. तर एकाच अभिनेत्याला घेऊन वसंतरावांचा संपूर्ण जीवनपट प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवायचा होता. त्यामूळे माझ्या डोक्यात चिन्मयच आला. मग फक्त केस पांढरे न करता, त्याच्या चेह-यात वयानुरूप होणारे बदल दर्शवण्यासाठी प्रॉस्थेटिक मेकअपचा मी आधार घ्यायचं ठरवलं. नाक, कान, हनुवटीची ठेवण अगदी वसंतारावांसारखीच दिसावी, असा यामागे उद्देश होता.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, बिग बींचा ‘पा’ फिल्ममध्ये मेकअप करणारे मेकअप आर्टिस्ट प्रदिप पेमगिरीकर सांगतायत Prosthetic Makeup बद्दल