आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinmay Mandlekar To Stage 9 Shows Of 5 Plays In A Week

चिन्मय मांडलेकर साकारणार एका आठवड्यात पाच नाटकांचे नऊ प्रयोग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: ‘तू माझा सांगाती’ या मालिकेसाठी १२ तासापेक्षाही अधिक काम दर दिवशी करुनही अभिनेता चिन्मय मांडलेकर रंगभूमीशी आपली नाळ सध्या घट्ट जोडून आहे. याच रंगभूमीच्या प्रेमापोटी येत्या २ एप्रिल ते ५ एप्रिल या कालावधीत चिन्मय त्याची भूमिका असलेली तब्बल पाच नाटकांचे नऊ प्रयोग साकारणार आहे. मच्छिंद्र कांबळी यांच्या ६८व्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईमध्ये नाटयमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात भद्रकाली प्रॉडक्शनची ‘मि.अॅंड मिसेस’, ‘नांदी’, समुद्र, सुखांशी भांडतो आम्ही, पांडगो इलो रे बा इलो ही पाच नाटके सादर होणार आहेत. या पाचही नाटकांमध्ये चिन्मयच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या नाटकांचे नऊ प्रयोग होणार आहेत. त्यामुळे चिन्मयचा मालिका सांभाळून या पाचही नाटकांच्या प्रयोग करण्यामध्ये कस लागणार आहे.
मि.अॅंड मिसेसमध्ये मधुरा वेलणकरबरोबरील पतीची भूमिका, समुद्रमधील स्पृहा जोशीबरोबरील भूमिका, नांदीमधील पौराणिक भूमिका अशा विविध शैलीतील भूमिका असल्याने चिन्मयपुढे ही पाचही नाटके यशस्वीपणे सादर करण्याचे आव्हान असणार आहे.