आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinmay Udgirkar And Girija Joshi Celebrates Their First Gudhi Padwa After Wedding

VIDEO: चिन्मयने साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, गिरीजाला दिला आयफोन गिफ्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतरच्या पहिल्या सणांचं विशेष कौतुक असतं. अभिनेता चिन्मय उदगीकर आणि अभिनेत्री गिरीजा जोशीचं डिसेंबरमध्ये लग्न झालंय. हा त्यांचा पहिला गुढीपाडवा आहे. त्यामुळे अर्थातच तो विशेष असणार आहे. गिरीजा पहिल्या गुढीपाडव्याला घरीच असली तरीही चिन्मय मात्र कामात आहे.
चिन्मय उदगिरकर सांगतो, “सध्या डेली सोप आणि नवीन नाटक दोन्हीमध्ये व्यस्त असल्याने पहिल्या गुढीपाडव्याला घरी बसणं शक्य नाही. बरं, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरी बसण्यापेक्षा काम केलेलं चांगलं. त्यामूळे घरी बसणार नाही. पण गिरीजा मात्र गुढीपाडवा छान सेलिब्रेट करणार आहे.”
गिरीजा ह्याविषयी सांगते, “ गुढीपाडव्याच्या दिवशी माझे आई-वडिल, चिन्मयचे आईवडिल आमच्यासोबत असल्याने दिवस खूप चांगला जाईल. पहिला गुढीपाडवा असल्याने आम्ही सगळे दूपारी एकत्र जेवू. पण खूप मोठं सेलिब्रेशन नसेल कारण चिन्मय सध्या मालिका करतोय. शिवाय त्याचं नवं नाटकही सुरू होतंय त्यामूळे तो काही वेळचं आमच्यासोबत असणार आहे.”
नवीन वर्षाला काही नवीन वस्ती घेण्याची प्रथा आहे. त्यामूळे नवीन काय घेतलं, असं विचारल्यावर गिरीजा म्हणते, “चिन्मयने मला नवीन आयफोन दिलाय. ह्याशिवाय सोनं खरेदी करण्याचा विचार चालला होता. पण आता असलेला फ्रिज थोडा खराब झालाय. तर नवीन फ्रिज खरेदी करण्याचा विचार आहे.”
चिन्मय आणि गिरीजाने मराठी नवीन वर्षाचा संकल्पही सोडलाय. पण त्यांचा संकल्प जरा मजेशीर आहे. त्याविषयी चिन्मय सांगतो, “गिरीजा डाएटिंग अजिबात करत नाही. त्यामूळे मी तिला यंदा डाएटिंग करायला लावणार आहे. “
तर गिरीजा सांगते, “ चिन्मयला स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यायला लावणं, हा माझा संकल्प आहे. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं आहे, ते नीट झोपणं. तो खूप कमी झोपतो. त्याला थोडं जास्त झोपायला लावणं, हाच ह्यावर्षीचा माझा संकल्प असेल.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, चिन्मय-गिरीजाने कसा साजरा केला गुढीपाडवा.. त्याचा व्हिडीयो
(फोटो - स्वप्निल चव्हाण)