आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Chitrafit 3.0 Megapixel\' This MMS Scandal Film For Adults Only

MMS स्कॅण्डलवर आधारित हा मराठी सिनेमा केवळ वयस्कांसाठी, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('चित्रफित 3.0 मेगापिक्सल' या सिनेमाचे पोस्टर)

समाजातील वास्तववादी चित्र पडद्यावर रेखाटण्यात अग्रस्थानी असलेल्या मराठी सिनेमाने नेहमीच काहीसे बोल्ड विषय हाताळताना आपला हात आखडता घेतला आहे. मात्र आता चाकोरीबद्ध सिनेमाच्या व्याख्येला छेद देत जाफ्रन फिल्म्स प्रा. लि.ने मराठी सिनेमाच्या कक्षा रुंदावणारा 'चित्रफित 3.0 मेगापिक्सल' हा सिनेमा बनवला आहे.
लेखक-दिग्दर्शक दिवाकर घोडके यांनी तरुणाईच्या भावविश्वात डोकावणारा एक वास्तववादी सिनेमा बनवला आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात मुली किंवा स्त्रिया जरी पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा काकणभर सरस ठरत असल्या तरी शारीरिक आणि भावनिक ऋणानुबंधनाचे कोडे त्या यशस्वीपणे सोडवू शकल्या आहेतच असे ठामपणे म्हणता येणार नाही. याच कारणांमुळे मैत्रीच्या नात्याखाली केली जाणारी फसवणूक, प्रेमाच्या गुलाबी पडद्याच्या आड केले जाणारे शारीरिक शोषण आणि भावनेच्या आहारी जाऊन केली गेलेली अगतिकता यांच्या जाळ्यात आजची तरुणाई अडकली आहे. 'चित्रफित 3.0 मेगापिक्सल' या सिनेमाच्या कथेचा डोलारा याच आधारावर उभारण्यात आला असून त्याला समाजात घडणा-या वास्तववादी घटनांची उत्कृष्ट जोड देण्याच आली आहे.
सिनेमाची वनलाइन
फाईन आर्टचा विद्यार्थी असलेला सिनेमाचा नायक आणि रिसर्चदरम्यान एकत्र आलेली सिनेमाची नायिका. आपापल्या क्षेत्रात शंभर टक्के योगदान देत अभ्यास करणा-या या दोघांमध्ये जेव्हा शारीरिक आकर्षण निर्माण होते, तेव्हा कॅमे-यात कैद झालेले चित्रण त्या मुलीच्या आयुष्याशी खेळ सुरु करते. त्यानंतर तिच्या आयुष्यात किंवा नायकाच्या आयुष्यात काही महत्त्वपूर्ण घटना घडतात. त्यांचा चढता उतरता आलेख या सिनेमात तरुणाईला भावेल अशा साध्या सोप्या भाषेत रेखाटण्यात आला आहे.
सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचे A सर्टिफिकेट
सिनेमातील बोल्ड कंटेट बघता सेन्सॉर बोर्डाकडून या सिनेमाला A सर्टिफिकेट देण्यात आले आहे. याविषयी दिग्दर्शक दिवाकर घोडके म्हणाले, की माझा हा सिनेमा वयस्क प्रेक्षकांसाठी आहे. त्यामुळे सिनेमाला A सर्टिफिकेट मिळेल, याची मला कल्पना होती. मात्र या सिनेमाच्या ट्रेलरमधून काही इंटीमेट सीन्स वगळून तो रिलीज करण्याचा आमचा विचार आहे. या ट्रेलरला U/A रेटिंग मिळेल, अशी आशा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'चित्रफित 3.0 मेगापिक्सल'मधील इंटीमेट सीन्सची झलक आणि जाणून घ्या सिनेमातील कलाकारांविषयी...