आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • College Friends Vaibhav Tatwawadi And Sidharth Chandekar Hosting MFK Awards

chocolate boyz वैभव-सिध्दार्थ MFK अवॉर्ड्समध्ये बनणार HOST, कॉलेजमधल्या दोस्तीचा होणार उपयोग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाच्या MFK म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण ह्या पुरस्कार सोहळ्यात एन्कर्सची नवी जोडी पाहायला मिळणार आहे. वैभव तत्ववादी आणि सिध्दार्थ चांदेकर ह्या दोघांना पहिल्यांदा एकत्र एन्करिंग करताना पाहता येणार आहे. दोघही सध्या कॉलेज तरूणींमध्ये फेमस आहेत.
पहिल्यांदा एकत्र सूत्रसंचालन करत असले, तरी वैभव आणि सिध्दार्थची मैत्री खूप जुनी आहे. दोघंही पुण्यातले,एकाच वयाचे आणि कॉलेजमध्ये असल्यापासूनचे मित्र. सिध्दार्थ सांगतो, “ मी पुण्याच्या एसपी कॉलेजचा विद्यार्थी आणि वैभव सीइपी कॉलेजचा विद्यार्थी. आमची मैत्री आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमुळे झाली. गेली सात ते आठ वर्ष आम्ही मित्र असल्याने एकमेकांच्या स्वभावाप्रमाणेच, एकमेकांच्या कॉमिक टायमिंगबाबत चांगलीच माहिती आहे. त्यामुळे एन्करिंग करताना एकमेकांना उत्तम साथ देऊ.”
वैभव म्हणतो, “सिध्दार्थसाठी एन्करिंग नवे नाही. मी त्याच्यापेक्षा सूत्रसंचलनामध्ये नवखा आहे, असं म्हटलं तरी चालेल. पण एक तर आमची मैत्री आहे. आणि दूसरं म्हणजे आम्ही चांगली रिहर्सल करून लोकांसमोर तयारीने उतरत आहोत. रिहर्सलमूळे आता जरा आत्मविश्वास आलाय.”
वैभव एन्करिंग करण्याशिवाय परफॉर्मही करणार आहे. शिवाजी महाराजांच्या गाण्यांवर तो डान्स करणार आहे. तो सांगतो, “ हे राजे, आणि मर्द मराठे अशी दोन गाणी आहेत. त्यावर मी डान्स करणार आहे. पहिल्यांदाच अशा दोन दोन जबाबदा-या असल्यामूळे थोडं टेन्शन आलंय. पण दोन्हीची रिहर्सल झाल्याने आता सगळं व्यवस्थित होईल असं वाटतंय”
(फोटो -प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी चाललीय वैभव आणि सिध्दार्थची रिहर्सल