आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतोष समजावतोय मृणालला,Shaddi Ke Side Effects, त्याला लागलेत सासरी जायचे वेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानिस
कलर्स मराठीवर ‘असं सासर सुरेख बाई’ ही नवी मालिका २७ जुलैपासून सुरू होतेय. शशांक सोळंकी निर्मित ही मालिका आपल्याला संतोष जुवेकर आणि मृणाल दुसानिस ह्या जोडीचा रोमँस आणि त्यांचं सासरं दाखवणारं आहे. सध्या मालिकेचा प्रोमो कलर्स मराठी वाहिनीवर दिसू लागला आहे. ज्यातून संतोष जुवेकर आमि मृणाल दुसानिस ह्या लीड कपलमध्ये रंगलेला वाद दिसून येतोय. लग्न करून दहा बाय दहाच्या चाळीतल्या घरात एका मुलीचं लग्नानंतरच आयुष्य किती खडतर आहे, ते संतोष समजवून सांगतोय. तर घराला घरपण देण्याविषयी मृणाल पटवून देतेय.
नुकताच ह्या मालिकेचा मुहूर्त झाला. तेव्हा शशांक सोळंकीना ह्या सासरचं वैशिष्ठ्य काय आहे, हे विचारल्यावर त्यांनी सांगितलं. “माहेरच्यांचं कौतुक प्रत्येक बाई आणि प्रत्येक पुरूषाला असते, त्यात काही नवीन नाही. पण जर एखाद्या जोडप्याला आपल्या माहेरच्यांच्या ऐवजी सासरच्यांच कौतुक अधिक असेल तर?...हा वेगळा Thought आहे, ह्या मालिकेच्या निर्मिती मागे.”
मालिकेच्या नावाबद्दल आणि कथानकाबद्दल विस्तृत माहिती सांगताना शशांक पूढे म्हणतात,”असं सासर सुरेख बाई हे भोंडल्याचं गाणं आहे. आणि त्यातून ही ओळ आम्ही मालिकेसाठी घेतली आहे. सासरं म्हटलं की ते मुलीचंच असतं,असंच नेहमी आपल्या डोक्यात असतं. अहो, पण पुरूषांनाही सासरं असतंच की. हे आपण ब-याचदा मालिकांमध्ये विसरतो. अनेक मुलांचीही लग्न करतेवेळी अनेक स्वप्न असतात. त्यांच्याही सासरच्या काही कल्पना असतात. काहींना आपलं सासर खूप श्रीमंत असावं, असं वाटतं. आणि या मालिकेतला यश अशी स्वप्न पाहणारा आहे. यश दहा बाय दहाच्या चाळीतल्या खोलीत रहाणारा आहे. आणि आजकालच्या महागाईच्या जगात चाळीतून मोठ्या घरात जाणं किती कठीण आहे, ते तुम्हां-आम्हां सर्वांनाच माहित आहे. यशला म्हणूनच कुठेतरी आपल्या आशा-आकांक्षाना आपल्या श्रीमंत सासरंच पाठबळ हवंय. पण नेमकी त्याला जी बायको मिळते, ती मोठ्या घरापेक्षा लहान घरातच मानाने आणि सुखी संसार करायला आसूसलेली असते. यशला त्याच्या सासरचं कौतुक असतं, तर त्याच्या बायकोला तिच्या सासरचं कौतुक”
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, संतोष जुवेकरच्या सासरचं वैशिषठ्य