आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACTS: दादा कोंडकेंच्या सिनेमांची व्हायची निगेटिव्ह पब्लिसिटी, एका मुलीचे होते वडील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खळखळून हसवणारे दादा कोंडके आज हयात असते तर त्यांनी वयाची 84 वर्षे पूर्ण केली असती. 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला होता. दादा कोंडके अभिनेत्यासोबतच सिनेनिर्मातेसुद्धा होते. मराठी सिनेमांमधील विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील सिनेमांची निर्मितीही केली. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. कमरेखालचे विनोद असे हिणावणारेसुद्धा त्यांचे सिनेमे मिटक्या मारत बघत.

खरे नाव नव्हते दादा कोंडके...
दादा कोंडके या नावाने सिनेसृष्टीत प्रसिद्ध झालेल्या या चतुरस्त्र अभिनेत्याचे खरे नाव कृष्णा कोंडके होते. मुंबईच्या नायगाव येथील एका मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. सिनेसृष्टीत ते दादा नावाने प्रसिद्ध झाले. 'विच्छा माझी पुरी करा' या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. 1969 साली भालजी पेंढारकरांच्या 'तांबडी माती' या सिनेमाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. सोंगाड्या (1971), आंधळा मारतो डोळा (1973), पांडू हवालदार (1975), राम राम गंगाराम (1977), बोट लावीन तिथे गुदगुल्या (1978) हे त्यांचे विशेष गाजलेले सिनेमे आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा,
सेन्सॉर बोर्डाशी नेहमी का व्हायचा दादा कोंडके यांचा वाद,
का व्हायची त्यांच्या सिनेमांची निगेटिव्ह पब्लिसिटी,
राज कपूर यांना दादांमुळे ढकलावी लागली होती बॉबीची रिलीज डेट पुढे,
दादा कोंडकेंनी घेतली होती बाळासाहेबांची मदत,
आशा भोसले बघायच्या त्यांचा प्रत्येक प्रयोग,
कसा असायचा दादांचा दिनक्रम, यासह जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरंच काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...