आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dada Kondke's Grandson Akshay Waghmare Entered In Marathi Film Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दादा कोंडकेंची तिसरी पिढी चित्रपटसृष्टीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता अक्षय वाघमारे)
सत्तर आणि ऐंशीच्या दशकात आपल्या विनोदी चित्रपटांनी महाराष्ट्राला खळखळवून हसवलेले अभिनेते आणि निर्माते दादा कोंडेके. त्यांची तिसरी पिढी आता चित्रपटसृष्टीत आली आहे. अभिनेता अक्षय वाघमारे हा त्यांचा नातू आता आपली चित्रपटसृष्टीतली घोडदौड सुरू करतोय.
दादांविषयी अक्षयशी बोलल्यावर तो सांगतो, “खरं तर दादा कोंडके हे माझे सख्खे आजोबा नाहीत. माझी आत्ते आजी ही दादा कोंडकेच्या कुटूंबातली आहे. दादा कोंडकेंचे चित्रपट माझ्या घरी अनेक वर्ष पाहिले गेले. माझे वडील तर त्यांचे फॅन आहेत. पण इतके वर्ष मला ह्या गोष्टींची माहितीच नव्हती. मी मुळचा फलटणचा आहे आणि मॉडेलिंगची आवड असल्याने पूणे परिसरातल्या छोट्या-मोठ्या अशा जवळजवळ ५०-६० जाहिरातींसाठी मी मॉडेलिंग केलं होतं. त्यातनंच मुंबईला करिअर करायला आलो. अभिनय करायची इच्छा होतीच. पण इथे स्ट्रगल खूप करावं लागलं. इथे आल्यावर डोअर टू डोअर सेल्समन बनण्यापासून ते स्पॉटबॉय बनण्यापर्यंत आणि चित्रपटात क्राउड सिनमध्ये उभं राहण्यापर्यंत हरत-हेची कामं केली. पण नशीब साथ देत नसल्याने हिरमुसून घरी परतलो. तेव्हा योगायोगाने मला दादा कोंडकेंचा मी नातू असल्याचा उलगडा झाला. आणि आश्चर्याचा धक्काच बसला. आता मात्र इथे नाव कमवून काही तरी बनण्याचा चंग बांधलाय.”
अक्षय वाघमारेने २०१३ ला ‘होऊ दे जरासा उशीर’ या चित्रपटातनं भूमिका केली. ज्या चित्रपटाने ऑस्कर भरारी मारली. यानंतर ‘स्ट्रगलर्स –आम्ही उद्याचे हिरो’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्येही तो दिसला. आता ‘शिव्या’, ‘मुंबई-पूणे-मुंबई-२’, ‘फोटोकॉपी’ आणि ‘युथ’ या चार चित्रपटांमध्येही तो आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मराठी इंडस्ट्रीतील नवीन चेहरा अक्षयची खास छायाचित्रे...