आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा कोंडके यांना करायचे होते या अभिनेत्रीशी लग्न, नकार दिल्यावर असा घेतला होता सूड !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवंगत अभिनेते दादा कोंडके जर आज आपल्यात असते तर आज त्यांचा 85 वा वाढदिवस त्यांनी साजरा केला असता. दादा कोंडके केवळ अभिनेतेच नाही तर चित्रपट निर्मातेही होते. सत्तरीचा आणि ऐशींच्या दशकात त्यांचे मराठी सिनेमे तुफान गाजले आणि ते त्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. त्यांच्या चित्रपटात हमखास मिळणारा एक चेहरा होता तो म्हणजे, उषा चव्हाण.  B'day : मिलमजुराच्या घरी झाला होता दादांचा जन्म, विवाहित असूनही वावरायचे अविवाहितासारखे
 
 
दादा कोंडके यांच्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या उषा आज चित्रपटांपासून दूर आहेत. दादा कोंडके यांच्या त्या आवडत्या अभिनेत्री होत्या इतकेच नाही तर दादा कोंडके यांना उषा यांच्याशी लग्नही करायचे होते. पण उषा यांनी यांस नकार दिल्यानंतर सूड घेण्यासाठी बायोग्राफीमध्ये उषा यांच्याविषयी अनेक वाईट गोष्टी लिहील्या. उषा यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा ६ ते ७ वर्षांपूर्वी त्यांच्या ब्लॉगवर केला आहे.  B'day : जेव्हा बाळासाहेब दादांना म्हणाले, 'थिएटरवाल्याचा पायजमा फाडून तुझ्या हाती देतो'
 
अशी होती उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची पहिली भेट..
दादा कोंडके यांना त्यांच्या 'सोंगाड्या' या चित्रपटासाठी अभिनेत्रीची गरज होती. त्यावेळी सातारा बसस्थानकाजवळ दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा दादांनी उषा यांची निवड केली आणि त्यांना पहिला ब्रेक मिळाला. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता, असे उषा म्हणतात. B'day : आईला नको असताना झाला होता जन्म, यामुळे नाव बदलून 'कृष्णा'चे झाले 'दादा'
 
पुढच्या स्लाईडवर वाचा कोण होत्या उषा चव्हाण आणि कोणते धक्कादायक खुलासे केले..
बातम्या आणखी आहेत...