आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daily Soap Honar Sun Mi Hya Gharachi To End After Naming Ceremony Episode

श्री-जान्हवीच्या बाळाचं झालं बारसं, बेबी आत्याने ठेवलं बाळाचं नावं ‘कृष्णा’, पहा बारशाचे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्री-जान्हवीच्या बाळाचं बारसं हा ‘होणारं सून मी ह्या घरची’ मालिकेतला सगळ्यात शेवटचा भाग असणार आहे. ह्यामध्ये मालिकेमधली सगळी पात्र एकत्र येताना दिसणार आहेत. जान्हवीची आई, सर्व सासूबाई, जान्हवीची मैत्रिण ह्या तर नटलेल्या दिसतीलच. सोबतच जान्हवी आणि आईआजींनी ह्या खास समारंभासाठी नऊवारी साडी नेसलीय. जान्हवीने गळ्यात श्रीने नुकताच दिवाळीला दिलेला दागिना घातलाय. श्रीने हातात कॅमेरा घेऊन ह्या सोहळ्याचे फोटो टिपण्याचं ठरवलेलं दिसतंय.
जान्हवीची साग्रसंगीत ओटी भरून, तिला आणि बाळाला ओवाळून मग बाळाला त्याच्या सर्व आजींनी पाळण्यात ठेवलं. आणि बाळाच्या बेबी आजीने बाळाचं कृष्णा असं नावं ठेवलं.
सगळे छान नटलेले असले तरीही आता विरहाचं दु:ख आणि निरोपाच्या चर्चा बारशावेळी सेटवर रंगू लागल्या होत्या. तेजश्री प्रधान ह्याविषयी सांगते, “आत्ता छान आनंदी वातावरण आहे. कारण आत्ता डोळ्यात पाणी आणून हा क्षण वाया नको घालवूया. ही भावना सगळ्यांच्याच मनात आहे. त्यामूळे आता कोणी रडत नाहीये. आणि चांगल्या मूडमध्ये दिसतायत. शिवाय आम्ही आता बारशाच्या सिक्वेन्सचे शुटिंग करतोय. त्यामूळे छान हस-या, आनंदी मूडमध्ये आहोत.”
“पण एकमेकांसोबत आत्ता छान विनोद, मस्करी, मस्ती करताना प्रत्येकाला माहितेय की, इथून आता आम्ही जेव्हा पॅकअप म्हणून निघू, तेव्हा ही मालिका, आणि हा सेट आणि आयुष्यातला हा टप्पा आमच्यासाठी संपून जाणार आहे. फक्त माणसंच नाही. तर आपण जेव्हा शुटिंग करतो, तेव्हा त्या वास्तूशीही आपला काही ऋणानूबंध जुळतो. त्यामूळे त्रास आम्हांला आता नक्कीच होणार आहे.”
तेजश्री पूढे म्हणते, “आम्ही आमच्या घरच्यांसोबत जेवढा वेळ घालवतं नाही, तेवढा वेळ इथे एकमेकांसोबत असतो. ही आमच्यासाठी दूसरी फॅमिली होते. आम्ही जवळ-जवळ ३६५ दिवस रोजचे १२ तास एकमेकांसोबत असल्याने आमच्यात ती एक जवळीक तयार झालीय. ही सेटवरची आमची फॅमिली आमचे स्वत:चे घरचे दूर असताना आम्हांला सांभळते. पण आता ह्यातल्या सहकलाकारांशी, तंत्रज्ञांशी पून्हा ह्या सेटवर भेट होणार नाही, ह्याची जाणीव प्रत्येकाला आहे. पण आमच्या आयुष्याचा हा भाग आहे. इथून निघून आता दूस-या सेटवर आम्ही काम करू. सध्या महिन्यातून एकदा तरी भेटायचंच, असं आणा-भाका घेणं आमचं चाललंय. बघू, पूढे एकमेकांना प्रत्येकजणं कामाच्या व्यापातून किती वेळ देऊ शकतोय.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा शशांक केतकर काय म्हणतोय, मालिका संपण्याविषयी